तर बाजार समिती खरेदी करणार माल !

0

पाचोरा –

एकीकडे पतसंस्थाना डबघाईचे दिवस येत असतांना गिरणाई नागरी सारख्या पतसंस्थेने स्वत:च्या मालकीची एक कोटीची जागा घेऊन स्वमालकीच्या जागेत स्थलांतर करणे याचा अर्थ त्या संस्थेच्या संचालक मंडळाने ग्राहकांचा विश्वास संपादन केल्यानेच ही संस्था दिवसेंदिवस प्रगतीचा टप्पा गाठत आहे. केंद्र शासनाने शेत मालास हमीभाव ठरवुन दिला असून या भावाप्रमाणे व्यापाऱ्यांनी माल खरेदी न केल्यास शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्याची जबाबदारी बाजार समितीची आहे. यासाठी प्रत्येक बाजार समितीस शासनाकडुन दिड कोटी रुपये अनुदान दिले जाणार असल्याची माहिती खासदार ए. टी. पाटील यांनी सांगितली. पाचोरा येथील गिरणाई नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्वमालकीच्या गाळ्यात स्थलांतर सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा बाजार समितीचे सभापती सतिष शिंदे तर प्रथम पाहुणे म्हणून भडगांव पिपल्स बॅंकेचे चेअरमन दत्ता पवार, माजी नगराध्यक्ष पंडित शिंदे, डॉ. भुषण मगर, विवेक वर्धनी पतसंस्थेचे चेअरमन सदाशिव पाटील, युवा नेते अमोल शिंदे, बाजार समितीचे उपसभापती अॅड. विश्वासराव भोसले, संचालक नरेंद्र पाटील, पं स सदस्य ज्ञानेश्वर सोनार, जि.प. सदस्य डी.एम.पाटील, देवगिरी बॅंकेंचे व्यवस्थापक एस.एल. पाटील, शशिकांत पाटील, गिरणाईचे उपाध्यक्ष निरज मुणोत, कार्यकारी संचालक अरुण शिंपी व्यासपिठावर होते.
कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष सतिष शिंदे यांनी आपल्या प्रास्ताविकात सदविवेक बुध्दीने काम केल्यास संस्थेच्या प्रगतीत अडथळा येत नाही. असे सांगून संस्थेने सभासदांचा विमा उतरविला असुन आतापर्यंत तेरा वारसांना लाभ मिळवुन दिला आहे. संस्थेतर्फे केरळ येथील आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी ११ हजार रुपयांचा धनादेश खा. ए.टी. पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. कार्यक्रमात दत्ता पवार, सदाशिव पाटील, जि.प.सदस्य मधुकर काटे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेच्या संचालिका सिंधुताई शिंदे, रेखा पाटील, विजयालक्ष्मी सतिष शिंदे, अॅड. जे. डी. काटकर, अनिल वाघ, रुपेश सतिष शिंदे, शैलेश पाटील, सुभाष सावंत, श्रीराम पाटील, संस्थेचे व्यवस्थापक पुरुषोत्तम चव्हाण होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार निरज (मुणोत) जैन यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.