आ.किशोर पाटील यांच्या हस्ते विविध रस्त्यांचे भूमिपूजन

0

पाचोरा (प्रतिनिधी) –

भारत स्वातंत्र्य झाला तरी त्यापुर्वीपासुन आजपर्यंत मतदारसंघातील अटलगव्हाण व चिंचखेडा गावापर्यंत पोहचण्यासाठी कुठल्याही स्वरूपाचे पक्का रस्ता झालेला नव्हता. दळणवळणासह अतीअत्यावश्यक सुविधा आणि सेवांसाठी अडचणी नेहमीचं उद्भवत असे आणि यापुर्वी तालुक्यातील या अगोदरचे नेतृत्वांनी नेहमीचं या गावांकडे दुर्लक्ष केले आणि या गावांची प्रमुख विकासासाठी मार्गचं हाचं फार मोठा अडथळा असल्याने जो पर्यंत हा मार्गातील अडचणी दुर होणार तो पर्यंत विकासाचे व स्वातंत्र्यांची सुर्यकिरणांची लहर सर्वसामान्य जनतेमध्ये व त्या गावांमध्ये पोहचु शकत नाही हे लक्षात आल्यावर पाचोरा-भडगाव मतदार संघाचे आ.किशोर पाटील यांनी तातडीने दखल घेऊन व ग्रामस्थांची वारंवार होणारी मागणी लक्षात घेऊन सदर कामाचे पाठपुरावा सातत्याने शासनदरबारी विविध माध्यमातुन आ.पाटील यांनी सुरू ठेवला होता. अखेर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास खात्याचे मंत्री पंकजाताई मुंडे व राज्यमंत्री दादासाहेब भुसे यांच्याकडे आ.किशोर पाटील यांनी करत आलेल्या पाठपुराव्यांना अखेर यश मिळाले व या रस्त्यांच्या कामासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत कामांना मंजुरी मिळाली आणि महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था जळगाव कडुन तातडीने निधी उपलब्ध करूण देण्यात आला आहे.
आणि याचेचं भाग म्हणुन आज तालुक्यातील कोल्हे ते अटलगव्हाण रस्त्याचे आणि तारखेडा ते चिंचखेडा बु. रस्त्यांची भुमिपुजने आ.किशोर पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आली.
कोल्हे ते अटलगव्हाण ३.४२ कि.मी रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण आणि जल:निस्तारणासह बांधकाम करणे यासाठी अंदाजित रक्कम १ कोटी ८५ लाख रू.निधी मंजुर करण्यात आला आहे.
तर तारखेडा ते चिंचखेडा बु.५.२५ कि.मी रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण आणि जल:निस्तारणासह बांधकाम करणे यासाठी अंदाजित रक्कम ३ कोटी १८ लाख रू.निधी मंजुर करण्यात आले आहेत.
म्हणून आज सुरूवातीला कोल्हे येथे तर नंतर अटलगव्हाण येथे भुमिपुजन करण्यात आले.यानंतर तारखेडा येथे आणि शेवटी चिंचखेडा येथे रस्त्याचे भुमिपुजन करण्यात आले.
आजपर्यंत जनतेची जी गैरसोय होत होती ती नक्कीच दुर होईल आणि विकासाची नांदी भविष्यात सर्वांसाठी या मार्गाने भरूण निघेल व एवढ्या वर्षांनंतर अखेर येथील जनतेला न्याय या रूपाने मिळाला आहे.तसेचं तारखेडा येथील शेतकरींना पण शेती करण्यासाठी फार गैरसोय होत होती.आता या रस्त्याने त्यांना फायदा होऊन नक्कीच दळणवळणाने त्यांच्या उत्पन्न वाढीस फायदा होईल अशी भावना आ.पाटील यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केली.
यावेळी सोबत जि.प सदस्य दिपकसिंग राजपुत, उध्दव मराठे अरूण पाटील शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेश पाटील तालुकाप्रमुख शरद पाटील, भरत खंडेलवाल, रमेश बाफना, स्वियसहाय्यक राजु पाटील सह इंजिनिअर आर. डी. पाटील व इंजिनिअर बडगुजर आणि कोल्हे येथील सरपंच सरलाताई रमेश बाफना मा.सरपंच गफुर तडवी कोमलसिंग देशमुख सरपंच पिंपळगाव हरे. भिवसन पाटील संतोष पाटील पांडुरंग तेली संभाजी पाटील अशोक फुलचंद तेली भास्कर महाराज सह काॅन्ट्रॅक्टर प्रदिपदादा पाटील व शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक सह विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते., तारखेडा येथील वसंत झिपरु वाघ आर.आर.पाटील राजु दगडु पाटील दिलीप भाऊसाहेब पाटील अशोक किसन पाटील संजय काशिनाथ पाटील धनराज विक्रम पाटील वसंत पाटील अभिमन बळीराम पाटील सचिन बाबूराव पाटील अनिल दगडु पाटील ज्ञानेश्वर पाटील दिनकर नामदेव बागूल अरून बाबूलाल पाटील ( सरपंच), चिंचखेडा येथील पोपट भाऊराव पाटील अर्जुन भावराव पाटील नाना पाटिल फुलचंद भाऊराव पाटील तसेच पिंपळगाव हरे. येथील किरण टेलर नाना सरकार कोमल आबा सरपंच भगवान पाटील रवी गिते सुदाम पाटील राजधर आबा अटलगव्हाण येथील संभाजी पाटील अशोक तेली पांडुभाऊ सरपंचताई ग्रामसेवक सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.