तरूणावर चाकूने वार करून प्राणघातक हल्ला

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क

भुसावळ शहरातील गडकरी नगर येथील रहिवासी असणार्‍या तरूणावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना रात्री घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

शहरातील गडकरी नगरातील रहिवासी असणारा शुभम दिलीप खत्री हा तरूण रात्री अकराच्या सुमारास घरी येत असतांना मागून वेगाने आलेल्या दुचाकीने त्याला टक्कर मारली. यामुळे तो खाली पडला. यानंतर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याच्यावर चाकूने वार करून पैसे व मोबाईल हँडसेट घेऊन पळ काढला.

या घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. शुभम दिलीप खत्री याला डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तर या संदर्भात रात्री उशीरापर्यंत बाजारपेठ पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Leave A Reply

Your email address will not be published.