तरुण ही मोठी शक्ती आहे, ती एकत्र आल्यास मोठी क्रांती : ह.भ.प. इंदूरीकर महाराज

0

पिलखोड, ता.चाळीसगाव : तुमच्याकडे सर्व काही यथोचित आहे पण सुख का नाही ते सुख मिळवण्यासाठी आपण काही करत नाही आपणास ते सुख मिळवण्यासाठी परमार्थ प्रार्थना व विठ्ठलाचे भजन करावेचं लागेल त्या शिवाय सुख प्राप्त होणार नाही व शेतकरी बांधवांनी शेतीवर अवलंबून न राहता शेतीला जोड धंदा म्हणून व्यवसाय करावा म्हणजे आपली फार मोठ्या प्रमाणावर प्रगती होईल तरुणांनी बाटली, मांसाहार व पर स्त्री पासून लांब राहावे म्हणजे तुम्ही जगात राजे व्हाल तरुण ही शक्ती आहे.

ती एकत्र आली तर फार मोठी क्रांती होणार आहे असे प्रतिपादन पिलखोड ता चाळीसगाव येथे प्रशांत पाटील मित्र मंडळ व गिरणा जल फाउंडेशन सदस्य यांनी आयोजित केलेल्या कीर्तनात ह भ प निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी केले पुढे म्हणाले आयोजकांनी चांगल्याप्रकारे तरुणांसाठी फार सुंदर कीर्तनाचा उपक्रम आयोजित केला म्हणून महाराजांनी शुभेच्छा देऊन गिरणा जल फाऊंडेशनचे कौतुक केले. यापुढे असा उपक्रम चालू ठेवावा असे आव्हान केले कार्यक्रमाचे प्रस्ताविक नीता चव्हाण मॅडम यांनी केले सूत्रसंचालन ए स पी मोरे यांनी केले.

चाळीसगाव मालेगाव नांदगाव तालुक्यातील 10000  हजार भाविकांनी व मान्यवरांनी व कीर्तन सेवनाचा लाभ घेतला कीर्तनासाठी बाळू पाटील निंबा शिरोडे पार्किंग साठी प्रकाश बाविस्कर यांनी जागा देऊन त्यांचे आभार मानण्यात आले मेहुणबारे पोलीस स्टेशनचे ए पीआय पवन देसले ट्रॅफिकचे पी आय प्रकाश सदगीर व त्यांचे सहकारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला वरील कार्यक्रम पार पाडण्यासाठी गिरणा जल फाउंडेशन चे सर्व  सर्व पदाधिकारी व सदस्य व पदाधिकारी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ मंडळी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.