डॉ.पायल आत्महत्याप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करा

0

अमळनेरात सामाजिक कार्यकर्त्यांतर्फे उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदन 

अमळनेर, दि 29 –

मुंबई येथे डॉ.पायल तडवी यांना आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍यां जातीयवादी व्यक्तींना तात्काळ अटक करावी त्यांची डॉक्टरकीचे रजिस्ट्रेशन रद्द करीत कठोर कार्यवाही न केल्यास युवकांतर्फे तिव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन आज उपविभागीय अधिकारी सिमा अहिरे यांना विविध संघटनांच्या युवकांनी दिले.

अमळनेर उपविभागीय अधिकारी कार्यालयात प्रांताधिकारी सिमा अहिरे यांची भेट  सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांचे सह युवा कार्यकर्ते मंगेश मोरे, सलिम तडवी, मुकेश सैंदाणे ,मछिंद्र वसावे,पंकज पाटिल,दिपक पानसे व युवकांनी घेतली. यावेळी रणजित शिंदे यांनी, मडॉ.पायल तडवी यांची आत्महत्या ही जातीयवादी मानसिकतेच्या छळाचा बळी आहे म्हणून बहुजन युवकांच्या भावना संतप्त आहेत म्हणून शासनाने याप्रकरणी गंभीर दखल घ्यावी !फ असे उपविभागीय अधिकारी यांना यावेळी झालेल्या चर्चेत सांगितले.

याप्रसंगी  उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डॉ.पायल तडवी यांना मुंबई येथे वैद्यकीय महाविद्यालयात मागासवर्गीय राखीव जागेवर प्रवेश मिळालेला होता. येथे तिला जातीयवाचक बोलणे, आर्थिक कुवत नसतांना केवळ मागास असल्याने अनुसूचित जमातीच्या जागेवर प्रवेश मिळाल्याचे अपमानास्पद बोलने अश्या अनेज प्रकारे धमक्या देत वरिष्ठ डॉक्टरांनी रॅगिंग घेत डॉ.पायल हिचा छळ केला.याबाबत डीन कडे डॉ.पायल ने तक्रार करूनही योग्य ती दखल घेतली गेली नाही.परिणामी डॉ. पायल ला आत्महत्या करावी लागली.यामुळे आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या संबंधित अधिकारी, डॉक्टर यांच्याविरोधात  अ‍ॅट्रॉसिटी  कायद्यानुसार व कलम 306 अंतर्गत गुन्हा नोंद होऊन कठोर शासन देण्याची कार्यवाही व्हावी! अशी मागणी करण्यात आली आहे.

सदर निवेदन देतांना

सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांचे सह युवा कार्यकर्ते मंगेश मोरे, सलिम तडवी, मुकेश सैंदाणे ,मछिंद्र वसावे,नुशरत तडवी,पंकज पाटील, राहुल जाधव,पंकज मनोरे,देवाशिव पाटील, विपुल मोराणकर,गोरख गायकवाड, दिपक पानसे आदिंसह युवक कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.