टी.आर.पाटील विद्यालय व इंग्लिश मेडिअम स्कूल येथे भारतीय सविंधान दिन संपन्न :

0

भडगांव (प्रतिनिधी) :  वडजी येथे आज दि. 26 नोव्हेंबर 2020 रोजी भारतीय संविधान दिनानिमित्त भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर,संस्थेचे संस्थापक कर्मवीर तात्यासाहेब यांच्या प्रतिमांचे पूजन,माल्यार्पण संस्थेचे चेअरमन प्रतापराव हरी पाटील यांचे हस्ते करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

उपशिक्षक वाय.ए.पाटील यांनी संविधान वाचन केले.तसेच 26/11 च्या शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.26  नोव्हेंबर 1949 रोजी भारताचे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्विकारण्यात आले.तेव्हापासून 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो.त्यानिमित्त विद्यालयात भारतीय संविधानातील मूल्य आणि तत्वांचा प्रसार व प्रचार व्हावा यासाठी सहशालेय सांस्कृतिक समिती व समन्वयक जे.एच.पवार,सर्व वर्गशिक्षक यांनी सर्व वर्ग व विद्यार्थ्यांचा ऑनलाइन व्हाटसअप् लिंकद्वारे संविधान वाचन,प्रचार,प्रसार बाबत जनजागृती करून सहभाग नोंदविला.मुख्याध्यापक डी.डी.पाटील,मा.प्र.मुख्या.बी.वाय.

पाटील,वरिष्ठ शिक्षक एस.जे.पाटील,प्राचार्य के.ए.मोरे सह सर्व शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.