भुसावळात लॉकडाऊनमध्ये वीज कंपनीची थकबाकी झाली तीनपट; तर थकीत ग्राहकांवर कारवाईचे संकेत

0

भुसावळ (प्रतिनिधी) : मार्च महिन्यात कोरोनाची लाट आल्यानंतर सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर अनेकांच्या हाताचा रोजगार हिरावल्याने वीज ग्राहकांनी वीज बिल न भरल्याने थकीत बिलाचा आकडा तब्बल तीप्पट झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आजअखेर भुसावळ शहरासह विभागात महावितरणची थकबाकी 16 कोटी 40 लाख झाली असून वीज कंपनीने ग्राहकांना वीज बिल भरण्याचे आवाहन केले आहे.

भुसावळ विभागातील भुसावळ शहर, भुसावळ ग्रामिण, जामनेर व पहूर या उपविभागातील रहिवासी, वाणिज्य व औद्योगिक वीज ग्राहकांकडे आता तब्बल 16 कोटी 40 लाख रुपयांची थकबाकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. महावितरणच्या भुसावळ विभागात भुसावळ अर्बन उपविभागात सर्वाधिक साडेआठ कोटी रुपये, ग्रामीण भागात दोन कोटी 90 लाख रुपये, जामनेर उपविभागात तीन कोटी, पहूर उपविभागात दोन कोटी असे एकूण 16 कोटी 40 लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रदीप घोरुडे यांनी शहर, तालुका व विभागातील थकीत शासकिय कार्यालयांमध्ये भेटी देवून अधिकार्‍यांना थकबाकी भरण्याची विनंती केली आहे. वीजग्राहकांनी आपल्या थकबाकीची रक्कम त्वरीत भरुन या कठीण काळात महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन घोरूडे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.