टाकळी गावातील नागरिक विषारी धुराने त्रस्त

0

चाळीसगाव (प्रतिनिधी)  :-चाळीसगाव नगरपालिकेच्या घनकचरा प्रकल्प हा टाकळी प्रचा गावाच्या जवळच असल्याने ह्या कचरा डेपो स आग लागली तर या आगीतून निघणारा विषारी धुराने टाकळी प्रचा गावातील नागरिक त्रस्त झाले आहे हा  डेपो बंद  करण्याबाबत म. मुख्यधिकारी श्री गोरे साहेब यांना उपोषणाशी नोटीस देण्यात आली होती, परंतु श्री मुख्याधिकारी श्री गोरे साहेब यांनी उपोषणकर्त यांना ठोस लेखी आश्वासन दिल्याने आता टाकळी प्रचा गावाची दररोज येणाऱ्या विषारी धुरापासून होणार मुक्तता होणार आहे.

दिनांक 3 /11/2020 रोजी समता परिषद ने सादर केलेल्या निवेदनानुसार दखल न घेतल्ल्या मुले काल दिनांक 8/12 /2020 रोजी उपोषणाला बसणार असल्याने दिलेल्या समरण पत्राची दखल घेऊन शहरातील निघणारा घनकचरा याची शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावणे कामी खत प्रकल्प प्रक्रिया करण्या कामी अंमलबजावणी सुरू केलेली आहे , तो पर्यंत टाकळी प्रचा गावात धूर होणार नाही याचे  ठोस आश्वसन चाळीसगाव नगरपालीकेचे मुख्याधिकारी गोरे साहेबानी दिले.

या प्रसंगी समता परिषद चे जिल्हा अध्यक्ष श्री सतीश महाजन सर , मा. सरपंच श्री चंद्रकांत जगनाथ महाजन,  पी ओ महाजन सर  ग्रामपंचायत सदस्य टाकळी प्रचा, मा सरपंच शांताराम चौधरी , चाळीसगाव नगरपालिकेचे नगरसेवक मा सुरेश भाऊ स्वार , नगरसेवक माजी आरोग्य सभापती घृष्णेश्वर तात्या पाटील हे उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.