कासोदा येथे कै.माजी आमदार सीताराम भाई बिर्ला यांची पुण्यतिथी साजरी

0

कासोदा ता, एरंडोल (प्रतिनिधी) येथे माजी आमदार व स्वातंत्र्यसैनिक कै  सीताराम भाई बिर्ला यांची पुण्यतिथी 10 डिसेंबर रोजी सालाबादाप्रमाणे बिर्ला चौकात त्यांच्या  पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व उत्साहात साजरी करण्यात आली.

 

कासोदा येथील सिताराम भाई बिर्ला यांचे अनुयायी एकनाथ शहादु धोबी व हमाल मापाडी संघटनेमार्फत सालाबादाप्रमाणे याही वर्षी उत्साहात साजरी करण्यात आली पुतळ्यास एकनाथ धोबी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

 

या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार समाजसेवक डॉक्टर नूरुद्दीन मुल्लाजी माजी सरपंच पुत्र भैया राक्षे जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष प्रमोद पाटील शिवसेना उपतालुका प्रमुख रवींद्र चौधरी रिपाई तालुका अध्यक्ष प्रवीण बाविस्कर पत्रकार जितेंद्र ठाकरे केदारनाथ सोमानी सुभाष बाविस्कर भगवान चौधरी निंबा पारधी गुलाब परदेशी पांडुरंग ठाकरे राजू शिंपी जळगावकर आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.