ज्वेलर्सच्या दुकानात गोमातेचे वास्तव्याने दुकानदार व ग्राहकही सुंतुष्ट

0

शेंदुर्णा ता.जामनेर प्रतिनिधी : भारत देश हा शेतीप्रधान आहे. यामुळे बैल, गाय व असंख्य पशु प्राणी याचे वास्तव्य हे बहुतांश शेतकरी बांधवांच्या घरी,शेतात  आपल्याला पहायला मिळते. शेंदुर्णीत मात्र एका सोने चांदीच्या दुकानात गायी मुक्तपणे संचार करतांना दिसतात अन विशेष ग्राहकांना याचा काही त्रास होत नाही. गोमातेच्या सान्निध्यात आपला व्यवसाय अधिक चांगल्या प्रकारे वाढतच असल्याचे पी.सी.ज्वेलर्स चे संचालक रमेश माणकचंद जैन यांनी सांगितले आहे.

येथील सुपरिचित पी.सी.म्हणजे प्रेमराज छोगमल जैन ज्वेलर्स मध्ये सकाळी दुकान उघडण्याच्या आधीच गायींचा जत्था दुकानाच्या जवळपास नित्यनेमाने उभाच असतो.मग दुकानाचे मालक रमेश शेठ जैन सकाळी ७-४० च्या दरम्यान दुकान उडतात त्याआधी गोमातेचे दर्शन घेऊनच ,ते दुकानात प्रवेश करताच या दोन तीन गायी त्यांच्या मागोमाग दुकानात जातात. दुकानात साफसफाई होते,पुजा अर्चा सुरु असते काही ग्राहक खरेदीसाठी दाखल होतात पुजा व जप पुर्ण होईपर्यंत या गायी शांतपणे उभ्या असतात काही दुकानात फिरताना आढळतात मात्र यांना ना दुकान चे मालक हटकतात न ग्राहक पुजा अर्चा झाल्यावर त्यांना केळी खाऊ घातली जातात व शांतपणे या गोमाता दुकानातुन निघुन जातात.दिवसभरात तीन चार वेळा असेच घडत असते गोमातेच्या बद्दल ज्वेलर्स च्या मालकांचे व त्यांच्या परिवाराचे ममत्व यामुळे ग्राहकांच्या मनातही आनंदाची भावना निर्माण झाली आहे.

एकादशीच्या दिवशी तर तीन वेळा गोमातेने गोमुत्र दिले मात्र आज पर्यंत कधीही शेण दुकानात टाकले नाही .दोन तीन वर्षापासुन हा नित्यनियम सुरू आहे.

गोमातेचीच कृपा…

या गोमातेच्या आमच्या दुकानात प्रेमाने येण्यामुळे आपल्याला व्यवसायात भरभराट झाली आहे सोबतच मनःशांती सुद्धा लाभत आहे. लक्ष्मी मातेच्या रुपात या गोमाता आम्हाला आशिर्वाद देत आहे. सकाळी जर कधीतरी दुकान उघडतांना गोमाता दिसली नाही तर दुकान उघडतांना जरा अवघडल्यासारखे होते व दिवसभर रुखरूख लागुन राहते यामुळे व्यवसायावरही थोडाफार फरक जाणवतो अशी भावना ज्वेलर्स चे संचालक रमेश माणकचंद जैन तसेच रोशन रमेश जैन, प्रतिक रमेश जैन यांनी व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.