पोलीसात तक्रार दिल्याचा राग ; पतीकडून पत्नीची चाकू भोसकून हत्या

0

धरणगाव : तालुक्यातील पाळधी येथील माहेर असलेल्या विवाहितेवर पतीने चाकू भोसकून खून केल्याची घटना आज बुधवारी  येथे १ वाजेच्या सुमारास घडली. पुजा सुनिल पवार (वय-२६) असे मृत महिलेचे नाव आहे. तर सुनिल बळीराव पवार (वय-३६) असे संशयित आरोपीचे नाव आहे. संशयित आरोपी पतीला गावकऱ्यांनी पकडून पोलीसांच्या स्वाधिन केले आहे.

याबाबत असे की, पाळधी येथील माहेर असलेल्या पुजा पवार या चुलत भाऊ मंगेश चव्हाण याचे लग्न असल्यामुळे त्या १६ फेब्रुवारीपासून माहेरी पाळधी येथे राहत होत्या. गेल्या काही महिन्यांपासून पती सुनिल पवार यांच्याशी कौटुंबिक वाद निर्माण झाले होते. त्यामुळे चुलतभावाच्या लग्नापासून विवाहिता ह्या पाळधी येथे माहेरी राहत होत्या.

यासंदर्भात पतीच्या विरोधात पुजा यांनी पाळधी पोलीसात तक्रार दिली होती. चौकशीकामी त्यांना आज पोलीसांनी सुनिल पवार याला बोलविण्यात आले होते. याचा राग पती सुनिल पवार यांच्या मनात होता. दरम्यान, आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास पतीसोबत विवाहिता पुजा ह्या बाजारात आल्या होत्या. त्याठिकाणी दोघांचे खटके उडाले. त्यामुळे संतापाच्या भरात पती सुनिल पवार याने बाजार पेठमध्ये पत्नी पुजाला मारहाण करण्यास सुरूवात केली. पतीच्या तावडीतून सुटून पत्नी मारवाडी गल्लीत असलेल्या माहेरी पोहचल्या. त्याच अवस्थेत पती सुनिल पवार याने पत्नीला चाकूने भोसकून ठार केले तर शालक शंकर भील चव्हाण याला देखील जखमी केले.

घटनेची माहिती मिळताच गल्लीतील ग्रामस्थांनी संशयित आरोपी पती सुनिल पवार याला पकडून पाळधी आऊट पोस्ट पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणी उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.