ज्येष्ठ शिक्षक डॉ. शिवचरण उज्जैनकर डिलीटने सन्मानित

0

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

नवीन माध्यमिक विद्यालय पारंबी ता. मुक्ताईनगर येथील ज्येष्ठ शिक्षक तथा शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांना २३ ऑक्टोबर रोजी संपन्न झालेल्या भव्य कार्यक्रमात गोवा येथील कॉमनवेल्थ ओकेशनल युनिव्हर्सिटी आफ्रिका टोंगाच्या डिलीटने सन्मानित करण्यात आले.

युनिव्हर्सिटी यु. एस. ए. इंटरनॅशनल अगरेडीटेशन ऑर्गनायझेशन मान्यताप्राप्त आहे. याप्रसंगी इस्रोचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुरेशकुमार कॉमनवेल्थ वोकेशनल युनिव्हर्सिटी  किंग्डम ऑफ टोंगाचे प्रो. व्हाईस चान्सलर डॉ. रिपु रंजन सिन्हा कॉमनवेल्थ युनिव्हर्सिटी किंग्डम ऑफ टोंगा आफ्रिका प्रो. ऑक्सना लोबानोवा स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट रशिया डॉ.नबल पजीयार माइंड पावर डेव्हलपमेंट सिस्टम काठमांडू आदी मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. शिवचरण उज्जैनकर यांना डिलीट प्रदान करण्यात आली.

हा सोहळा  कॅन्डोलीम गोवा येथील नोवोटेल या पंचतारांकित हॉटेलमध्ये हा भव्य सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी  गोवा येथील कामगार युवा नेते एडवोकेट अजितसिंह राणे व ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश तळवडेकर तसेच सोलापूर येथील प्राचार्य डॉ. सुभाष कदम साहेब कोल्हापूर येथील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक डॉ.श्रीकांत पाटील बाल साहित्यिक डॉ.मा.ग. गुरव आदींनी उज्जैनकर यांचा  पुस्तकं व श्रीफळ भेट वस्तू देऊन कोल्हापुरी फेटा बांधून सत्कार केला तर मुरगुड जिल्हा कोल्हापूर येथे सुप्रसिद्ध शिल्पकार एम.डी. रावण आंतरराष्ट्रीय सद्गुरु कृष्णदेव गिरी परशराम आंबी सर सचिन कुसनाळे सर आदींनी सुद्धा कोल्हापुरी फेटा बांधून व पुस्तकं व श्रीफळ भेट देऊन उज्जैनकर व प्रकाश सोनार यांचा सत्कार केला.

उज्जैनकर हे गेल्या चोवीस वर्षापासून तालुक्यामध्ये शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, कला, आरोग्य, कृषी व पर्यावरण अशा विविध क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारे एकमेव शिक्षक आहेत त्यांनी या लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी विशेष ऑनलाईन उपक्रम राबवलेले आहेत ते शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष असून केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्लीचे राष्ट्रीय संघटन सचिव सुद्धा आहेत.

त्याचप्रमाणे ते भुसावल येथील माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पतपेढीचे संचालक सुद्धा आहेत, तसेच शिक्षक लोकशाही आघाडीचे तालुका अध्यक्ष सुद्धा आहेत. त्यांचा  डिलीटने सन्मानित झाल्याबद्दल त्यांचे महाराष्ट्रातील विविध संस्थांनी व साहित्यिक मान्यवरांनी तसेच  सन्माननीय मुख्याध्यापक व शिक्षक बंधूंनी अभिनंदन केले आहे.

उज्जैनकर यांना यापूर्वी ग्लोबल पीस युनिव्हर्सिटी अमेरिकेने समाजकार्यामध्ये तसेच साउथ वेस्टर्न यूनिवर्सिटी अमेरिकेने मास कम्युनिकेशन मध्ये मानद डॉक्टरेटने गौरवलेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.