जेएनयू हल्ल्याने २६/११ ची आठवण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर रविवारी झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर देशभरात रोष व्यक्त केला जात आहे. ठिकठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, या घटनेवर  आज मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जेएनयुत झालेला हिंसाचार पाहिल्यानंतर मला 26/11च्या मुंबईवरील हल्ल्याची आठवण झाली. राज्यातील विद्यार्थी सुरक्षित असून त्यांनी काळजी करू नये असेही उद्धव यांनी म्हटले.

जेएनयुत रविवारी सुमरे 100 गुंडांनी प्रवेश केला. त्यांनी जेएनयु विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयेषा घोष हिच्या सह सुमारे 34 विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली. त्याबाबत ठाकरे म्हणाले, मला मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याची आठवण या हल्ल्याने झाली. तोंड बांधून आलेले हे हल्लेखोर कोण होते हे शोधायला हवे. त्यांना बुरखा घालण्याची गरज कारण ते डरपोक होते. असे हल्ले महाराष्ट्रात खपवून घेतले जाणार नाही. विरोध तर होणारच , जे कोणी जबाबदार आहेत त्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. यात मी कोणतंही राजकारण आणू इच्छित नाही, यामागचा खरा चेहरा समोर आणण गरजेचं. यात पोलिसांचं कर्तव्य आहे त्यांनी कारवाई न केल्यास ते सुद्धा संशयास्पद, असेही म्हणाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.