जीवनावश्यक सेवा उपलब्ध करुन न देणाऱ्यांची तक्रार शिवसैनिकांकडे करा ; समाधान महाजन

0

भुसावळ | प्रतिनिधी  

संचारबंदीच्या कालावधीत नागरिकांनी जीवनावश्यक सेवा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे व आपल्या सेवा या अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याने किराणा माल विक्रेता, खाजगी दवाखाने, केमिस्ट यांना सूचना मिळाल्या आहेत.

इतर रोगांच्या उपचारासाठी खाजगी दवाखाने नियमित सुरू ठेवणे अति आवश्यक आहे. किराणा दुकान संचारबंदी कालावधीत सुरु ठेवण्यात यावे.  ग्राहकांना घरपोच सेवा देण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करावी. दुकानातील माल हा त्याच्या एमआरपी पेक्षा जास्त दराने विक्री करता कामा नये अथवा वाजवी बाजारभावापेक्षा जास्तदराने विक्री करु नये असे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल अश्या सूचना जळगाव जिल्ह्याचे पालक मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या असल्यावर सुद्धा काही दुकानात बाजारभावापेक्षा जास्त दर आकाराला जात आहे तसेच भुसावळ तालुक्यातील बऱ्याच खाजगी दवाखान्यात रुग्णांवर उपचार बंद करण्यात आले. अश्या अनेक तक्रारी शिवसेना भुसावळ तालुका प्रमुख समाधान महाजन यांच्याकडे आल्या.

दुकानात सर्व प्रकारच्या वस्तूंचा आवश्यक तो साठा असणे आवश्यक आहे तो संपल्यास त्याची उपलब्धता संबंधित पुरवठादारांकडून त्वरित करुन घेण्यात यावी. अत्यावश्यक सेवेच्या वस्तूंची साठेबाजी करण्यात येवू नये त्याचा साठा हा अनुज्ञेय असलेल्या संख्येतच असणे आवश्यक आहे.  किराणा माल विक्रेत्यांनी कडधान्य व तृणधान्य संदर्भात स्वत:कडे साठा नोंदवही  ठेवण्यात यावी. दोन ग्राहकांच्यामध्ये किमान तीन फुट अंतर राहील या पध्दतीने ग्राहकांना दुकानात व दुकानासमोर उभे राहण्यासंदर्भात व्यवस्था करण्यात यावी. दुकानदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी माक्सचा वापर करावा तसेच दुकान व परिसरात वेळोवेळी निर्जंतुकिकरण करावे.  दुकानाच्या बाहेर दर्शनी भागात आपणाकडे सदर वस्तूचा आवश्यक साठा उपलब्ध असल्याबाबत व त्याची विक्री एमआरपी पेक्षा जास्त करत नसल्याबाबतचा सूचना फलक लावण्यात यावा व खाजगी दवाखाने नियमित सुरू ठेवावे अश्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.

किराणा दुकान मालक, खाजगी डॉक्टर्स, फार्मासिस्ट यांनी आपल्या कर्तव्याचे काटेकोर पालन करावे व सदर सूचनांचे पालन काटेकोरपणे करण्यात आले नसल्यास नागरिकांनी स्थानिक पोलीस प्रशासन, शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिकांशी संपर्क साधावा असे आवाहन तालुका प्रमुख समाधान महाजन यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.