जि.प. सदस्या जयश्री पाटील, अनिल भाईदासांविरुद्ध गुन्हा दाखल

0

 

तहसीलदारांना धमकी व शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी 

अमळनेर :– येथील जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील व तहसीलदार श्रीमती ज्योती देवरे यांच्यात दि 19 रोजी झालेल्या वादावरुन अमळनेर पोलिसात आज दि 20 रोजी सकाळी शासकीय कामात अडथळा निर्माण केला व धमकी दिल्याचा गुन्हा जि. प.सदस्या जयश्री अनिल पाटील व जिल्हा बँक संचालक अनिल भाईदास पाटील या दोन्हींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादि तहसीलदार ज्योती रामदास देवरे वय 42 रा अमळनेर यांनी त्यांच्या फिर्यादेत म्हटले आहे की दि.19 रोजी नेहमीप्रमाणे माझे दालनात कार्यलयीन कामकाजाच्या अंतर्गत सकाळी 11ते 12 वाजेच्या दरम्यान पी.एम.किसान विस्तारीत स्वरुपाच्या योजनेबाबत आढावा बैठक घेत होती सदर बैठकीस गटविकास अधिकारी संदीप वायाळ,तालुका कृषी अधिकारी भारत वारे हे योजना कामी लागाना-या संगणकाच्या नियोजनाकामी स्थानिक माहिती असलेले अमळनेर नगरपरिषदेचे संजय चौधरी हे उपस्थित होते.त्यात शिपाई रमेश बंजारा यांना मिटींग सुरु असल्याने भेटणा-यांना न येवू देणेबाबत सांगण्यात आले होते.त्यावेळी साधरणतः 11 वाजेच्या सुमारास मिटींग सुरु असतानाच एक महिला, शिपाई बंजारा याला न जुमानता जोराने दरवाजा लोटत आक्रमक पणे माझ्या दालनात शिरल्या या ओरडात तुम्हांला लाज वाटते का? माझा फोन का उचलला नाही ? तुम्हाला भान आहे का? असे जोर जोराने ओरडल्या.त्यावर मिटींग चालू असल्याने फोन न उचल्याबाबत मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला.व कृपया आपण कोण आहात? आपले काय काम आहे ? असे त्यांना विचारले, तरी देखील त्या आरडाओरड करीत राहिल्या.तेव्हा मी त्याना सांगितले की,माझी महत्वपूर्ण विषयाची बैठक सुरु आहे व मी पदाधिकारी आहे. आपण मला तुमचे काम सांगा व माझा जास्त वेळ घेवु नका असे सांगत त्यांना बसण्यास सांगितले व पुन्हा त्यांना त्यांची

ओळख विचारली.तेव्हा त्यांनी त्यांचे नांव जयश्री अनिल पाटील असे सांगून त्या जिल्हा परिषद सदस्य असल्याचे सांगितले.व त्या सुमारे 10 मिनीटा पावेतो माझेवर विविध आरोप करीत ओरडतच राहिल्या. त्यावेळी मी त्यांना पुन्हा पुन्हा माझ्यावर निराधार आरोप करुन माझी उपस्थितांसमोर प्रतिमा खराब करु नका असे सांगत होती.मात्र त्यांनी काहीएक न ऐकता आरडाओरड करीत निराधार आरोप करून माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे माझा अपमान झाला व मी करीत असलेल्या शासकीय कामात पी.एम, किसान सारख्या महत्वपूर्ण विषयांत सुमारे 20 मिनिटचा अडथळाही आला. त्यानंतर यांनी माझ्या शासकीय दालनातील टेबलावर जोरजोरात हात आपटून माझ्या दालनातील उपस्थिता समोर माझी प्रतिमा मलिन करुन माझा अवमान करन माझे मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न केला.व अमळनेर मध्ये कशी नोकरी करतात,तुम्हांला आता बघुनच घेते असा सज्जड दम देवुन जाणिवपूर्वक जोरात दालनाचा दरवाजा आपटला.त्यांच्या या वर्तनाने कार्यकारी दंडाधिकारी या पदाची प्रतिमा मलिन झाली आहे.त्यांना समज देवूनही त्यांनी कार्यकारी दंडाधिकारी यांना वारंवार अपमानित केले आहे, यावरही त्यांनी न थांबता सायं 7 वाजेच्यासुमारास पत्रकार परिषद घेवुन

निराधार व बिनबुडाचे आरोप करुन,मोर्चा काढून,उपोषण करण्याची धमकी देवुन माझी बदनामी केली.त्यामुळे मला मनस्ताप झाला आहे व माझे मनोधैर्य खच्चीकरण झाले आहे. त्यानंतर त्यांचे पती अनिल भाईदास पाटील यांनीसुध्दा मला फोनवर ही तुमच्या अंगावर 100 बाया सोडून देतो व बघा कसे सांभाळतात ते असे धमकाविले.तसेच त्यांनी त्यांचे अनोळखि कार्यकर्ते यांना फोनकरुन माझ्या तोंडाला काळे फासण्यासाठी

येणार असल्याचे सांगुन धमकाविले म्हणून जयश्री अनिल पाटील व अनिल भाईदास पाटील यांच्या विरुद्ध अमळनेर पोलिसात भादवी कलम 353 व 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रकाश सदगिर करीत आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.