जिल्ह्यात मान्सूनचे पुनरागमन

0

जळगाव (प्रतिनिधी) अनेक दिवसांपासून दडी मारलेला पाऊस पुन्हा परतला अाहे. खरिपाची पेरणी अाटाेपल्यानंतर पंधरवड्यापासून जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा हाेती. शनिवारी रात्रीपासून जिल्हाभरात पावसाने पुनरागमन केल्याने शिवारात चैतन्य पसरले अाहे. वाढत्या तापमानापासूनही दिलासा मिळाला अाहे. रविवारी दुपारी २ वाजता जळगाव शहरासह तालुक्यात २० मिनिटे दमदार पाऊस झाला.

गेल्या दाेन दिवसांपासून जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात तुरळक पाऊस हाेत अाहे. शनिवारी रात्री चाेपडा वगळता जिल्ह्यात जाेरदार पावसाने हजेरी लावली. रविवारी दिवसभर अनेक ठिकाणी पावसाचे अागमन झाले. जळगाव शहर अाणि तालुक्यात दुपारी दमदार पाऊस झाला. वाढत्या उकाड्यापासून या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला.

रविवारी पहाटेपर्यंत झालेला पाऊस
जळगाव ८.५३ मिलिमीटर, जामनेर ७.६० मिमी, भुसावळ २.३५ मिमी, बाेदवड ३.३३ मिमी, मुक्ताईनगर ८ मिमी, पाचाेरा २.४२ मिमी, धरणगाव २०.९० मिमी, पाराेळा ११.८० मिमी, रावेर ४.८५ मिमी, यावल १०.३६ मिमी, अमळनेर ७.१३ मिमी, चाळीसगावमध्ये ७ मिमी पाऊस झाला. चाेपडा, भडगाव अाणि एरंडाेल तालुक्यात पावसाने दडी मारली.

Leave A Reply

Your email address will not be published.