जिल्ह्यात दिवसभरात दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू ; १२३ बरे

0

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण सातत्याने घटत आहे. गेल्या दीड महिन्यापासून नव्या बाधितांचा आकडा घटत असून बरे होणाऱ्यांची संख्या दररोज अधिक असल्याचे दिसून येते. गुरुवारी प्राप्त अहवालात जिल्ह्यातून ६३ रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून १२३ रूग्ण बरे होवून परतले आहे. विशेष बाब म्हणजे आजच्या अहवालात जिल्ह्यातील चार तालुक्यात निरंक असल्याचे दिसून आले आहे.

 

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर- २७, जळगाव ग्रामीण-३, भुसावळ-११, अमळनेर, चोपडा, पाचोरा प्रत्येकी १, भडगाव-४, भडगाव, एरंडोल, पारोळा, मुक्ताईनगर मध्ये निरंक (०), यावल-१, जामनेर-३, रावेर-१, चाळीसगाव-७ आणि बोदवड ३ असे एकुण ६३ रूग्ण बाधित आढळून आले आहे.

जिल्ह्यात एकुण ५३ हजार ९६ रूग्ण बाधित आढळून आले असून त्यापैकी ५० हजार ८५७ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. आज दोन रूग्णांचा मृत्यू झालाय तर जिल्ह्यात एकुण १ हजार २६१ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. जिल्ह्यात रिकव्हरी रेट ९५.७८ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.