जिल्ह्यात खरीप हंगाम मशागतीसाठी वेग

0

जळगाव: सतत विविध नैसर्गिक संकटांचा सामना करीत असलेला शेतकरी यंदा कोरोनाच्या संकटातही मान्सूनपूर्व शेती कामासाठी वेगाने सरसावला आहे.

यातच शेतीसाठी आवश्यक असलेल्या खतांच्या किमतीत वाढ झाली असल्याचे तुणतुणे विविध खत कंपन्यांकडून वाजविण्यात येत आहे, तशा बातम्या देखील प्रकाशित करण्यात सर्वत्र आल्या आहे. परंतु दुसरीकडे केंद्र सरकारकडून खतांच्या किमतीत कुठलीही दरवाढ झाली नसल्याचा दावा करण्यात आला असल्याने शेतकरी संभ्रमात पडले आहेत.

त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रात जाऊन स्टॉक पडून असलेल्या खतांची जुन्या दरात खरेदी करण्यास गर्दी केली असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे. खतांच्या किमतीत दरवाढ झाली तर निश्चितच ती शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारे ठरणार आहे. शेतकऱ्यांचे अर्थकारण हे पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे, परंतु शेतकरी दरवर्षी निसर्गाच्या सुल्तानी संकटाला बळी पडत आहे, त्यामुळे शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. शेतकऱ्यांनी दुःखावर पाघरूण टाकीत मशागतीस वेग दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.