जिल्ह्यात आज ३६ नवे रुग्ण ; तर ४८ कोरोनामुक्त

0

जळगाव : जिल्ह्यात आज दिवसभरात ३६ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर ४८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. गेल्या २४ तासात २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जळगाव जिल्ह्यात दिवाळीपूर्वी दोन महिन्यांपासून रुग्णसंख्या सातत्याने घटत होती. बरे होणाऱ्यांची संख्या अधिक व नवे बाधित त्यापेक्षा कमी अशी स्थिती सलग दोन महिने राहिल्यानंतर ॲक्टिव रुग्णसंख्या चारशेच्या आत आली. दिवाळीनंतर मात्र पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली. गेल्या आठवडाभरापासून नवे बाधित अधिक व बरे होणारे कमी असे आकडे समोर येत होते.

जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ५४५६१ झाली आहे. त्यात ५२७२५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. जिल्ह्यात सध्या ५३७ रूग्ण उपचार घेत आहे. जिल्ह्यात आज पर्यंत १२९९ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी दर ९६.६३ वर आला आहे.

असे आढळले रुग्ण:-

जळगाव शहरात १५, जळगांव ग्रामिण ००, भुसावळ ०५, अमळनेर ०५ , चोपडा ०१ ,पाचोरा ०२ , भडगाव  ०१,धरणगाव ०१, यावल ००, एरंडोल ००, जामनेर ००, रावेर ०१ ,पारोळा ०१,चाळीसगांव ०२, मुक्ताईनगर ००, बोदवड ०२, इतर जिल्ह्यातील ०० असे रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.