जिल्ह्यातील शिक्षकांची व्यथा

0

भातखंडे (प्रतिनिधी) कोरोना विषाणू महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शिक्षक आपत्ती व्यवस्थापनासाठी कर्तव्य बजावत आहेत. यात प्राथमिक माध्यमिक, उच्च माध्यमिकचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कोरीना विषाणूचा पादुर्भाव ज्या ज्या भागांमध्ये आढळून आलेला आहे त्या त्या भागात तहसील कार्यालयामार्फत ड्युटीला लावल्या जात आहे. यासाठी तहसील कार्यालयाकडून प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या याद्या मागवल्या आहेत.

मुख्याध्यापकांनी त्या याद्या सरसकट पाठवल्या गेल्याच्या दिसून येत आहेत. यात पन्नास वर्षे वयोगटापेक्षा अधिक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांना काही दुर्धर आजार आहे का? यातील कोणतीही खातरजमा न करता याद्या पाठविल्याचे दिसते. त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची त्यांनी काळजी घेतली नसल्याचे दिसून येत आहे. शिक्षक व अन्य कर्मचारी शासनाच्या कामकाजात नेहमीच सहभाग घेत असतात. शाळा प्रमुख हा कुटुंब प्रमुख असतो. त्यामुळे हे लक्षात घेणे गरजेचे आहे की कोरोना विषाणू असलेल्या ठिकाणी आपल्या कर्मचारी बांधवांना काम करावे लागणार आहे.

प्रतिकार शक्ती उत्तम असलेल्या कर्मचाऱ्यांनाच अशा कर्तव्यावर पाठवणे उचित ठरणार आहे. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी घेणे आवश्यक आहे. परंतु तशी काळजी न घेता याद्या सरसकट दिल्याचे दिसून येत आहे. आपला कर्मचारी कोविड-१९ चा संसर्ग ज्या भागात आहे त्या ठिकाणी जाऊन कर्तव्य बजवणार आहे. त्या ठिकाणी काम करीत असताना त्यांना दुर्धर आजर,बायपास, एन्जोप्लास्टी, अतिउच्च दाब ,मधुमेह व अन्य आजार असल्यास संबंधीत कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अगोदरच त्या ठिकाणी आपल्या कर्मचारी बांधवांना कोणत्याही आरोग्यासाठी सुविधा उपलब्ध नाहीत. मास्क ,सॅनिटाझर , स्व संरक्षण करण्यासाठी स्वतःलाच घायची आहेत. हे सर्व करत असताना एखाद्या कर्मचाऱ्याचे बरे-वाईट झाल्यास याला जबाबदार कोण ? शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक वा अन्य कोणी ? म्हणून

विचार करा…
आपल्या व्यवसाय बांधवांना आपणच सांभाळू शकतो।

Leave A Reply

Your email address will not be published.