कर्मचाऱ्यांच्या व नागरिकांच्या सहकार्यानेच राज्यात नंबर वन !

0

महाष्ट्रात प्रथम आलेल्या मारवड पोलीस स्टेशनचे एपीआय राहुल फुला यांचे सत्काराला उत्तर

अमळनेर (प्रतिनिधी):-सहकारी कर्मचारी आणि नागरिकांच्या सहकार्यामुळेच राज्यात नंबर वन पोलीस स्टेशन म्हणून पुरस्कार मिळाला असे प्रतिपादन मारवड पोलीस स्टेशनचे एपीआय राहुल फुला यांनी मांडळ गावतर्फे डॉ अशोक पाटील व सामाजिक कार्यकर्ते रतीलाल पाटील यांच्या सहकार्याने आयोजित नागरी सत्काराला उत्तर देताना केले
सविस्तर वृत्त असे की मारवड पोलीस स्टेशन अंतर्गत ६० गावे असून एक अधिकारी व २४ कर्मचारी वर्ग आहे, मिनीस्ट्रि ऑफ फायनान्स भारत सरकार तर्फे बेस्ट पोलीस स्टेशन निवड पुढील निकषांवर करण्यात येते त्यामध्ये महिला संबंधी, मालमत्तेसंबंधी व इतर मायनर कायद्दायान्वये दाखल गुन्हे, निर्गती, पोलीस भष्ट्राचार चे केसेस, पोलीस स्टेशन वास्तु व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची वागणुक, जनतेच्या पोलीस स्टेशन व पोलीस कर्मचा-यांबद्दलच्या प्रतिक्रिया बाबत व इतर निरीक्षणाच्या आधारे १५५७९ पो स्टे पैकी ७९ पोलीस स्टेशन ची निवड करण्यात आली आहे. यामध्ये सर्व बाबींचा सर्वे करून देशातुन टाॅप १० व प्रत्येक राज्यातुन एक असे टाॅप 36 पोलीस स्टेशनची बेस्ट पोलीस स्टेशन म्हणुन निवड करण्यात आली आहे सन २०१९ करीता महाराष्ट्रातुन टाॅपर मारवड पोलीस स्टेशनला बेस्ट पोलीस स्टेशनचा बहुमान नुकसाच मिळाला आहे. याचे औचित्य साधून सपोनि राहुल फुला यांचा जाहीर नागरी सत्कार मांडळ येथे दि ३० रोजी सायंकाळी ७.०० वाजता करण्यात आला, राहुल फुला यांचा सत्कार गावातील पोलीस पाटील भास्कर पाटील,डॉ अशोक पाटील,व रतीलाल पाटील,मोठाभाऊ कोळी यांच्याहस्ते शाल, श्रीफळ,बुके देवून तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प स चे गटविकास अधिकारी संदिप वायाळ यांचा सत्कार रतीलाल पाटील यांच्याहस्ते शाल,श्रीफळ, बुके देवून करण्यात आला यावेळी गावातील तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब पवार,सुनील पाटील,मा सरपंच नारायण कोळी यांनी आपले मनोगत व्यक्त केली

सत्काराला प्रतिउत्तर देतांना सपोनि राहुल फुला म्हणाले की मिनीस्ट्रि ऑफ फायनान्स तर्फे २०१८ पासून पोलीस स्टेशन चे कामकाज चे सर्व्ह करण्यात आले होते. त्यात मारवड पोलीस स्टेशन अव्वल स्थान मिळविले यात माझ्यासह माझे कर्मचारी वर्ग यांचे ही सहकार्य लाभले आहे. तसेच गावकऱ्यांचे देखील त्यांनी आभार मानले तर अध्यक्षीय भाषणात गटविकास अधिकारी संदीप वायाळ म्हणाले की राहुल फुला साहेब आणि माझा संबंध हागणदारीमुक्त, कोरोना आजार संदर्भात वेळोवेळी आलेला आहे,त्यांनी त्यांचं अभिनंदन करून पंचायत समिती चे विविध योजना सांगितल्या, दारूबंदी, घरकुलची कामे,शौचालय, बिहार पॅटर्न विषयी मार्गदर्शन केले. यावेळी माजी सरपंच अशोक कोळी,समाधान पाटील, सुनील पाटील, जितेंद्र पाटील,रमेश पाटील,राजू धनगर,मधू टेलर,प्रमोद पाटील,चेतन पाटील,योगेश भोई विकास सोसायटी चेअरमन,बडोदा बँक मॅनेजर,पांडू भिल, सह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सुनिल पाटील यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.