जिल्ह्यातील रिकव्हरी रेट ९४.०३ टक्क्यांवर ; आज १५२ नवे रुग्ण

0

जळगाव : जिल्ह्यात आज १५२ रूग्ण कोरोना बाधित आढळून आले तर आजच १६९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर आज ३ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ५२ हजार ४१ वर गेली आहे. तर जिल्ह्यात आजपर्यंत एकुण ४८ हजार ९३५ रूग्ण कोरोनामुक्त झाले.

असे आढळले रुग्ण 

जळगाव शहर- ५७, जळगाव ग्रामीण- ७, भुसावळ-२४, अमळनेर-९, चोपडा-१४, पाचोरा-७, भडगाव-३, धरणगाव-०, यावल-६, एरंडोल-१, जामनेर-८, रावेर-११, पारोळा-०, चाळीसगाव-३, मुक्ताईनगर-०, बोदवड-२, इतर जिल्हा-० असे एकुण १५२ रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहे.

सध्या जिल्ह्यात १ हजार ८६२ रूग्ण उपचार घेत आहे. आज ३ बाधित रूग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत एकुण १ हजार २४४ रूग्णांचा मृत्यू झालाय. जिल्ह्यातील रिकव्हरी रेट हा ९४.०३ टक्क्यांवर पोहचला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.