जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग थांबेना ; आज ५४१ नवे रूग्ण आढळले

0

जळगाव : जिल्ह्यातील कोरोना बाधिता ची संख्या काही केल्या कमी होत नाहीय. आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात ५४१ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले असून ५३२ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यात सर्वाधीक ११७ रूग्ण हे जळगाव शहरातील आहेत. जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या २८ हजार १३२ वर गेली आहे.

असे आढळले रूग्ण

जळगाव शहर ११७, जळगाव ग्रामीण२९; भुसावळ-३५; अमळनेर-९०; चोपडा-५७; पाचोरा-८; भडगाव-११; धरणगाव-३३; यावल-१०; एरंडोल-३१; जामनेर-५७; रावेर-५; पारोळा-२४; चाळीसगाव-६; मुक्ताईनगर-१२; बोदवड-११ व इतर जिल्ह्यातील ५ अशी रूग्ण संख्या आढळून आली आहे.

दिलासा देणारी बाब अशी की, आज दिवसभरात ५३२ रूग्ण बरे झाले असून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या २०२६८ रूग्ण बरे झाले आहेत. तर ७०४२ रूग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर एकूण मृतांची संख्या देखील ८२२ इतकी झालेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.