जिल्हा सहकारी बाेर्ड अध्यक्षपदी प्रदीप देशमुखांची बिनविराेध निवड

0

जळगाव | जिल्हा सहकारी बाेर्डाच्या रिक्त असलेल्या अध्यक्षपदी जे‌ष्ठ संचालक प्रदीप देशमुख यांची बिनविराेध निवड करण्यात अाली. सहकारी बाेर्डाचे अध्यक्ष बापुराव देशमुख यांचे निधन झाल्याने रिक्त झालेल्या अध्यक्ष निवडीची सभा १२ फेब्रुवारी राेजी अायाेजित केली हाेती. निवडणूक निर्णय अधिकारी के. बी. बारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत प्रदीप देशमुख यांची बिनविराेध निवड करण्यात अाली.

चाळीसगाव विविध कार्यकारी साेसायटी, देखरेख संघ अध्यक्ष, बेलगंगा सहकारी साखर कारखाना उपाध्यक्ष, बाजार समिती संचालक, राष्ट्रीय सहकारी शिक्षण सहकारी मंडळ संचालक, जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे संचालक अशी सहकारातील विविध पदे देशमुख यांनी भूषवली अाहेत.

यावेळी संचालक सुदाम पाटील, अानंदराव देशमुख, प्रा. मनाेहर संदानशिव हेमंतकुमार साळुंखे, प्रविण गुजराथी, अमित सिसाेदे यांच्यासह संचालक उपस्थित हाेते. जिल्हा मध्यवर्ती बंॅकेत प्रदीप देशमुख यांचा सत्कार करण्यात अाला. बंॅकेच्या अध्यक्षा अॅड. राेहिणी खडसे-खेवलकर, संचालक गुलाबराव देवकर, तिलाेत्तमा पाटील, कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख, धरणगाव बाजार समितीचे सभापती सुनिल पवार उपस्थित हाेते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.