बोदवड येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न

0

बोदवड (प्रतिनिधी) : – पोलिस स्टेशनमध्ये आगामी शिवजयंती व एकलव्य जयंतीच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक दि.१२ रोजी संपन्न झाली. यावेळी मुक्ताईनगर उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश जाधव, पोलिस निरीक्षक सुनील खरे, पोलिस उप निरीक्षक भाईदास मालचे उपस्थित होते.

यावेळी बोलतांना श्री.जाधव यांनी सांगितले की,आगामी शिवजयंती व एकलव्य जयंती शांततेच्या मार्गाने पार पाडावी,कायद्याच्या चौकटीत राहून प्रत्येकाने जयंती साजरी करून पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

डि.जे.लावण्यास बंदी असून डि.जे.लावू नये असा प्रकार आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला.यावेळी शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष संभाजी जाधव,नगरपंचायत गटनेते कैलास चौधरी,एकलव्य जयंती समितीचे विनोद मोरे,कालु गायकवाड,हर्षल बडगुजर,संजय वराडे,प्रमोद धामोडे,संजय काकडे,अनंता वाघ,अनिल देवकर,निवृत्ती ढोले,संजय गायकवाड,यांचेसह शिवप्रेमी व एकलव्य प्रेमींची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.