जिल्हा बँक अध्यक्षा रोहीणी खडसे यांची कोरोनावर मात

0

जळगाव – माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची कन्या तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा आणि नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या रोहिणी खडसेंना १५ नोव्हेंबर रोजी कोरोनाची लागण झाली होती. जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. त्यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर शहरातील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते.
त्यांच्यासोबत त्यांची मुलगी सारा आणि मुलगा समरजीत यांना देखील बाधा झाल्याने सारा हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

आठ दिवसांच्या उपचारानंतर आज तिघांचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आला असून तिघांनी कोरोनावर मात केली. गेल्या आठवड्यात रोहिणी खडसे यांनी आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे आपल्या ट्विटर अकाउंट वरून सांगितले होते. आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला .याप्रसंगी कोरोनापासून बरे केल्याबद्द्दल डॉक्टरांचे आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.