जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक रवींद्रभैय्या पाटलांचा राजीनामा; चर्चेला उधाण

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा बँकेचे ज्येष्ठ संचालक रवींद्रभैय्या पाटील यांनी संचालकपदाचा राजीनामा दिल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले.   त्यांनी नाराजीतून राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.

तसेच काही  बाबीसाठी बँक सहकार्य करीत नाही, कायदेशीर विषय असून देखील अडवणूक केली जात असल्याने ऍड. पाटील यांची नाराजी वाढली होती. त्यांनी बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांच्याकडे राजीनामा दिला आहे, अध्यक्षा ॲड रोहिणी खडसे खेवलकर या राजीनाम्यावर निर्णय घेतील. असे देखील  अॅड.रवींद्र पाटील यांनी याबाबत सांगितले.

जिल्हा बँकेत काल खूप घडामोडींचे चक्र फिरले.  ईडीने संत मुक्ताई साखर कारखान्यासाठी दिलेल्या कर्जाबाबत विचारणा करणारी नोटीस बजावल्याने आधीची मोठी  खळबळ उडाली असतानांच  रवींद्रभैय्या पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते बँकेचे ज्येष्ठ संचालक असून त्यांनी बँकेच्या चेअरमनपदाची धुरा देखील सांभाळलेली आहे. त्यांचे वडील भाऊसाहेब प्रल्हादराव पाटील हे देखील प्रदीर्घ काळ संचालक व नंतर चेअरमन होते. अर्थात, जिल्हा बँकेच्या इतिहासातील काही दशके पाटील घराण्यातील संचालक कार्यरत आहेत. या पार्श्‍वभूमिवर, रवींद्रभैय्या पाटील यांनी ऐन निवडणुकीआधी थेट राजीनाम्याचा निर्णय घेतल्याने सर्वांना औत्सुक्य लागले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.