जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडून सुंदर माझे कार्यालय कामाची पाहणी

0

उस्मानाबाद (प्रतिनिधी) :  दि,२५ जून रोजी, जिल्हा परिषदेमध्ये चालू असलेल्या सुंदर माझे कार्यालयाच्या कामकाजाची जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती आणि सदस्य आदी पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांसमवेत पाहाणी करून चालू असलेल्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.

जिल्ह्यातील ग्रामपंचायत,अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळा, आरोग्य उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्र, पंचायत समिती, तालुकास्तरावरील सर्व कार्यालये तसेच जिल्हा परिषद कार्यालयामध्ये सुंदर माझे कार्यालय या उपक्रमांतर्गत स्वच्छता, रंगरंगोटी, अभिलेख वर्गीकरण, वृक्षारोपण आदीबाबत कामकाज चालू आहे. हे कामकाज कशा पध्दतीने चालू आहे, यात काही सुधारणा करणे आवश्यक आहे काय, या अनुषंगाने पाहणी केली. उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सुंदर माझे कार्यालयांतर्गत आतापर्यंत काय काय केले हे पहाणीच्या वेळी दाखवून दिले, सर्व मान्यवरांनी पाहणी वेळी समाधान व्यक्त केले.

ही पाहणी करताना पदाधिकाऱ्यांनी काही सूचनाही केल्या, यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती अस्मिता ताई कांबळे, उपाध्यक्ष धनंजय सावंत, सभापती दत्ता अण्णा साळुंखे, दत्तात्रेय देवळणकर, शशिकला टेकाळे,  सदस्य संदीप मडके, प्रकाश आष्टे, उषा येरकळ आदींसह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंत कुंभार, नितीन दाताळ, गजानन सुसर, तानाजी चिमणशेट्टी, डॉ. हनुमंत वडगावे, नितीन भोसले, राजू शिंदे, वैजनाथ चौगुले, डॉ.नामदेव आघाव आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.