जिल्ह्यात काँग्रेस ला पुन्हा बळकटी देणार:-अमळनेरच्या सभेत नाना पटोले यांचा निर्धार

0

अमळनेर(प्रतिनिधी) : केंद्राच्या काळ्या कृषि कायद्यांमुळे शेतकरी उध्वस्त होण्याची वेळ आली आहे असा घणाघाती आरोप अमळनेर येथील मेळाव्यात काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.यावेळी त्यांनी केंद्राच्या धोरणांवर सडकून टीका केली.महागाई,पेट्रोल-डिझेल च्या दरवाढीने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असून देशात एकाधीकरशाही सुरू झाली आहे.

अमळनेरच्या शेतकऱ्यांना मदत व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून पीक विम्याचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे तसेच धरण क्षेत्रातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांचे पुनर्वसन करण्यावर भर दिला जाईल.

यावेळी व्यासपीठावर आमदार कुणाल पाटील,आमदार प्रणिती शिंदे,आमदार शिरीष चौधरी,माजी खासदार उल्हास पाटील, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील,जिल्हाध्यक्ष संदीप पाटील,निरीक्षक शोभा बच्छाव, प्रदीप पवार,डी.जी.पाटील आदी नेते उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहराध्यक्ष मनोज पाटील यांनी केले.यावेळी तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे,शहराध्यक्ष मनोज पाटील,तालुका युवक अध्यक्ष महेश पाटील,शहर अध्यक्ष तौसिफ तेली,सुभाष पाटील,मुन्ना शर्मा,धनगर दला पाटील,प्रवीण जैन तसेच शहर व ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कृषिभूषण साहेबराव पाटलांची उपस्थिती

अमळनेर शहरातील सुविधा,रस्त्याचे सुशोभीकरण आदी कामांसाठी त्यांनी अमळनेर नगरपरिषदेचे कौतुक केले,शहराच्या विकासासाठी माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या कार्याची दखल पटोले यांनी घेतली.साहेबराव पाटील यांच्या विधानसभेतील कार्याचा तसेच पाडळसरे धरणासाठी केलेल्या त्यांच्या कार्याचा उल्लेख त्यांनी यावेळी आवर्जून केला.

बुधवार ची सभा गुरुवारी संपली

सायंकाळी ८ वाजता होणारी सभा रात्री ११.३० ला सुरू होऊन रात्री १२.३० पर्यंत सुरू होती.पुढच्या वेळी अमळनेर ला जास्तीचा वेळ देण्याचा शब्द पटोले यांनी दिला.आमदार अनिल पाटील यांनी मान्यवरांचे शहरात आल्यानंतर शुभेच्छा देऊन स्वागत केले तसेच मेळाव्याच्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेतल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.