जिल्हा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी; गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  

जळगाव जिल्हा कारागृहात कैद्यांच्या दोन गटात  हाणामारी झाल्याची घटना घडली. भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या कारागृह पोलीस कर्मचाऱ्याला एकाने चावा घेतला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव जिल्हा कारागृहात अमोल ऊर्फ कार्तिक नाना सोनवणे (मराठे) (वय 29, रा. खेडी ब्रुदूक ता. जळगाव) हा खूनाच्या गुन्ह्यात जळगाव जिल्हा करागृहात आहे.  गुरुवारी कारागृह अधीक्षक अनिल वांढेकर हे कारागृह गस्त घालत होते.  यावेळी कैदी गणेश सोनवणे हा त्याच्या बॅरेकच्या बाहेर निघुन त्याने बॅरेक 9 मध्ये जावुन टिव्ही लावला. यावेळी न्यायबंदी समाधान वाल्मीक शेवाळे याने अमोल याला तू आमच्या बॅरेक मध्ये कशासाठी आला, येथे आमचे साहित्य चोरीला जाते असे सांगितल्यावरून या वादाला सुरुवात झाली.

या वादात टिव्ही फोडण्याची धमकी देत, टिव्हीचा रिमोट तोडला. अमोल याचा मित्र तेजस दिलीप सोनवणे याच्यासह चेतन पितांबर सोनार असे दोघे वादात पडल्यानंतर वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. हाणामारी झाल्यावर कारागृह पोलीस कर्मचारी निवृत्ती काशिनाथ पवार, सुभाष बाबुराव खरे व तुरूंगाधीकारी धावत आले.

अमोल सोनवणे याला धरून भांडण सोडवून नेत असतांना त्याने कारागृह अधीकार्‍यांशीच वाद घातला. हाणामारी थांबवुन अमोल सोनवणे याला अधीक्षकांच्या सांगण्यावरुन बॅरेक मध्ये बंद करण्यास नेत असतांना त्याने कर्मचारी दत्ता हनुमंत खोत, रोशन लहुगिरी, निवृत्ती पवार सुभाष रोकडे यांच्याशी झटापट केली.

यात दत्ता हनुमंत खोत या कर्मचार्‍याच्या हाताला कडाडून चावा घेतला. खोत यांच्यावर वैद्यकीय उपचार करुन याप्रकरणी जिल्हापेठ पेालिसांत तक्रार देण्यात आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.