जिल्हाभरात होणार कार्यशाळा

0

शाळासिद्धीत नोंदवा वास्तव परिस्थिती – डॉ. महाजन

जळगाव : राष्ट्रीय मूल्यांकनाचा कार्यक्रम शाळासिद्धी 2019-20 साठीची नोंदणी सुरू झाली असून शालेय मूल्यांकन हे माध्यम आणि शाळा सुधारणा हे लक्ष्य असलेल्या शाळासिद्धीमध्ये वास्तव परिस्थितीची नोंद करा, असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. राजेंद्र महाजन यांनी येथे केले.

जळगाव येथील मुलींच्या डीएड कॉलेजमध्ये आयोजित जिल्हास्तरीय शाळासिद्धी निर्धारकांच्या सहविचार सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शाळासिद्धीचे जळगाव जिल्हा संपर्क अधिकारी डॉ. जगदीश पाटील व निर्धारक गुलाम दस्तगीर उपस्थित होते. प्रारंभी डॉ. महाजन यांनी शाळासिद्धी संदर्भात जळगाव जिल्ह्यात आयोजित तालुकास्तरीय कार्यशाळा व त्यासाठी तज्ञ मार्गदर्शक यांच्या संदर्भात माहिती देऊन कार्यशाळा यशस्वी करण्याचे आवाहन केले. तसेच 31 डिसेंबरपर्यंत शंभर टक्के शाळा स्वयंमूल्यमापन करण्याचे सांगितले. त्यानंतर शाळासिद्धीचे जळगाव जिल्हा संपर्क अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी पीपीटीद्वारे शाळासिद्धीची संकल्पना सविस्तर स्पष्ट करून सांगितली आणि शाळासिद्धी स्वयंमूल्यमापन 2019-20 भरताना घ्यावयाची काळजी याविषयी सुद्धा त्यांनी पीपीटीद्वारे माहिती दिली. यावेळी प्रत्येक तालुक्याला दोन याप्रमाणे बत्तीस निर्धारकांची उपस्थिती होती. हे निर्धारक दि. 17 पासून आपल्याला नेमून दिलेल्या तालुक्यात शाळासिद्धी कार्यशाळा घेणार आहेत. आभार प्रमोद आठवले यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.