जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मुलाखतीचे गुरुवारी जळगाव आकाशवाणी केंद्रावरुन होणार प्रसारण

0

जळगाव :- कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यात दि. 15 सप्टेंबर ते 25 ऑक्टोबर या कालावधीत दोन टप्प्यात माझे कुटूंब, माझी जबाबदारी हे अभियान राबविण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यात हे अभियान राबविण्यास सुरुवात झाली असून अभियानाचा उद्देश, अभियान काळात नागरीकांनी घ्यावयाची काळजी, अभियान राबविण्याची पध्दत, जिल्ह्यात अभियानाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे नियोजन, उपाययोजना याबाबत माहिती देणारी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची मुलाखत आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरुन गुरुवार, दि. 17 सप्टेंबर, 2020 रोजी सकाळी ठिक 7.45 वाजता प्रसारित होणार आहे.

जिल्हाधिकारी राऊत यांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येत असलेली माझे कुटूंब, माझी जबाबदारी ही मोहिम हे महत्वाचे शस्त्र आहे. या मोहिमेच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक नागरीकाचे आरोग्य सर्व्हेक्षण, तपासणी, उपचार याबाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली आहे. त्याचबरोबर 50 वर्षावरील नागरीक, जुने आजार व लक्षणे असणाऱ्या व्यक्तींनी घ्यावयाची काळजी, आरोग्य पथकास नागरीकांनी करावयाचे सहकार्य आदिंबाबत आपल्या मुलाखतीत माहिती देणार आहे.

ही मोहिम यशस्वी करण्यासाठी सामाजिक संस्था, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांनी करावयाचे सहकार्य, जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती, कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासन करीत असलेल्या उपाययोजना, जिल्ह्यातील आरोग्य सुविधा आणि कोरानाच्या साखळी तोडण्यासाठी नागरीकांनी घ्यावयाची दक्षता आदिं विषयांवर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आपल्या भावना या मुलाखतीत व्यक्त केल्या आहेत.

ही मुलाखत जळगाव आकाशवाणीचे ज्येष्ठ उद्घोषक सतीश पप्पु यांनी घेतली आहे.  तरी जिल्हावासियांनी ही मुलाखत गुरुवार, 17 सप्टेंबर, 2020 रोजी सकाळी ठिक 7.45 मिनिटांनी आपल्या जळगाव आकाशवाणी केंद्रावर ऐकण्याचे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.