जायंटस ग्रुप ऑफ तेजस्विनी व महिला पर्यावरण सखी मंचतर्फे बालिका दिन साजरा

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले जयंती निमित्त जायंट्स ग्रुप ऑफ तेजस्विनी व महिला पर्यावरण सखीमंच यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती म्हणजेच बालिका दिन निमित्त अपंग सेवा मंडळ मूक बधीर विद्यालय जळगाव येथे मूकबधिर बालिका पूर्वा, स्नेहा, दिक्षा, आलिया, निलोफर, शिफा, आफरिन यांचे बालिका पूजन करण्यात आले. तसेच त्यासोबत त्यांना खाऊ वाटप करण्यात आला.

यावेळी जायंटस ग्रुपच्या राजकमल पाटील मॅम यांनी सावित्रीबाई फुले जीवन व कार्य यावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी शे निशांत और जा ह्यांनी मूकबधिर विद्यार्थिनींना सांकेतिक भाषेत स्पष्ट करून सांगत होते. यावेळी अध्यक्षा मनिषा पाटील व प्रमुख पाहूणे समाज कल्याण विभागाचे अधिकारी भरत चौधरी यांनी देखील मनोगत मांडले.

यावेळी अध्यक्षा मनिषा पाटील, राजकमल पाटील, विभावरी पाटील, नेहा जगताप, मनिषा एस पाटील, नूतन तासखेडकर, इंदिरा पाटील यांसह शिक्षक वृंद मुख्याध्यापक  एकनाथ पवार ,शिक्षिका निता सोमाणी, शे निशात अ रज्जाक, हेमंत मुंदडा उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.