जामनेर येथील ज्ञानगंगा विद्यालयामध्ये गुरू पौर्णिमा उत्साहात साजरी

0

जामनेर :-येथील ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरु पूर्णिमा उत्सव विद्यार्थ्यांनी शिक्षकांना गूलाब पुष्प व पेन देवून व भाषणांद्वारा साजरा केला.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य आर.जे. सोनवणे व प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षकवृंद उपस्थित होते. विदयालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून शिक्षकांविषयी आपली कृतज्ञता व्यक्त केली.अध्यक्षीय भाषणात  प्राचार्य सोनवणे यांनी महर्षि व्यास हे भारतीय संस्कृतीचे मूलाधार होते व भारतीय संस्कृतीत गुरू-शिष्याच नातं फार महत्त्वपूर्ण आहे.गुरुपौर्णिमा या दिवशी गुरूंची पूजा करतात. शिक्षक अंधारातून प्रकाशाकडे नेत असतो.याप्रकारे गूरु पौर्णिमेविषयी सविस्तर माहिती सांगितली.विनय खोंडे,विजय कोळी,योगेश बावस्कर,स्नेहल पाटील या शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करुन आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.