जामनेरात शामा प्रसाद मुखर्जी यांना अभिवादन !

0

भाजपा सदस्य मोहिमेत सहभागी होण्याचे ना.महाजन यांचे आवाहन
जामनेर | प्रतिनिधी
जिल्हयाचे पालकमंत्री मा.ना.गिरीष महाजन यांच्या जामनेर येथील संपर्क कार्यालयात काल दि.६ रोजी शामा प्रसाद मुखर्जी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी शामा प्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेस राज्याचे जलसंपदा तथा वैद्यकिय शिक्षण मंत्री ना.गिरीष महाजन यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानतंर ना.महाजन यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टी सदस्य मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.या मोहिमेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन ही ना.महाजन यांनी यावेळी केले.त्या कार्यक्रमाला जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील,भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर,नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष अंनिस शेख,गटनेते डॉ.प्रशांत भोंडे,नगरसेवक डॉ. अरविंद बोंडेकर,महेंद्र बाविस्कर,प्रा.शरद पाटील,अतिष झाल्टे,बाबुराव हिवराळे,प्रमोद वाघ,कैलास नरवाडे,दिपक तायडे,नामदेव पालवे,शिवाजी शिंदे,फारूक मनियार यांच्यासह नगरसेवक,बुथ व शक्ती केंद्र प्रमुख,पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.