शिवसेनेतर्फे अभियांत्रिकी प्रवेश विद्यार्थांकरिता ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी मोफत केंद्राचे उद्घाटन

0

भुसावळ | प्रतिनिधी  

भुसावळ तालुका शिवसेनेतर्फे पदाधिकारी व शिवसैनिक यांच्या मदतीने जिल्हाप्रमुख चंद्रकांत  पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अभियांत्रिकी प्रवेशासाठी आवश्यक असा ऑप्शन फॉर्म भरून घेण्यासाठीचे मोफत  केंद्र सुरू करण्यात आले आहे.
सदरचे केंद्र शिवसेनाप्रमुखांच्या 80 टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण या तत्वातील समाजकारणाचा भाग म्हणून सुरू करण्यात आल्याचे तालुकाप्रमुख समाधान महाजन यांनी सांगितले सदरच्या अभियांत्रिकी प्रवेश ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी च्या मोफत केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी भुसावळ विधानसभा शिवसेना संपर्कप्रमुख  विश्राम  साळवी रावेर विधानसभा शिवसेना संपर्कप्रमुख व  मोहन मसुरकर जामनेर विधानसभा शिवसेना संपर्कप्रमुख  श्रीकांत पाटील या मान्यवरांच्या हस्ते केंद्राचे उद्घाटन करण्यात आले सदर केंद्रावर ऑप्शन फॉर्म भरून घेण्याचे आवाहन भुसावळ शिवसेनेतर्फे करण्यात आले होते सदरचा कार्यक्रम तीन दिवस चालणार असून या मोफत सुविधेचा अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन भुसावळ तालुका शिवसेने मार्फत करण्यात येत आहे सदर केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी शिवसेनेचे वरणगाव शहर प्रमुख रवींद्र सुतार भुसावळ शहर प्रमुख नीलेश महाजन विभाग प्रमुख पंकज पाटील यांचेसह केंद्राचे संयोजन विधानसभा क्षेत्र संघटक निलेश सुरडकर सदर केंद्रावर विद्यार्थ्यांना सहकार्य करण्यासाठी तसेच ऑप्शन फॉर्म भरून घेण्यासाठी कल्पेश चौधरी व मोहित पाटील परिश्रम घेत आहेत सदर केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रियांमधून शिवसेनेच्या या  कार्यास शुभेच्छा दिल्या तसेच शिवसैनिकांचे अभिनंदन करून मनोबल वाढविले वर्षभर शिवसेनेने असेच समाजोपयोगी कार्य केल्याबद्दल भुसावळ तालुका शिवसेनेचे देखील अभिनंदन केले आहे आणि यापुढे भुसावळ तालुका शिवसेनेने असेच सामाजिक शैक्षणिक तसेच राजकीय कार्य करीत रहावे यासाठी शुभेच्छा दिल्या . तसेच सदरच्या केंद्रावर इतर शाखांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी संपर्क साधून प्रवेशासाठीचे अर्ज ऑप्शन अर्ज तसेच इतर मदत आवश्यक असल्यास घ्यावी असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात येत आहे सदरचे मोफत केंद्र विद्यार्थ्यांसाठी सकाळी 8 वाजेपासून सायंकाळी आठ वाजेपर्यंत चालू राहणार असून विद्यार्थ्यांना मोफत सहकार्य केले जाईल असे संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.