जामनेरात घुटका खाऊन थुंकणाऱ्यास कोर्टाचा दणका

0

जामनेर(प्रतिनिधी):-कोर्ट आवारामधे गुटखा खातांना आढळल्यामुळे वैभव मोहन बुंदे रा सिरसोली जळगाव आणी मंगेश वसंत वाघ रा ओझरखुर्द ता जामनेर यांना न्यायाधिश ए ए कुळकर्णी यांच्या पुढे हजर केले असता वरील दोघांना १२०० रूपये दंड व दंड न भरल्यास सात दिवसांच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली.

घटना (२०) दुपारी घडल्याचे सुत्रांनी सांगीतले. फिर्यादी पोकॉ निलेश सोनार व मोहन पासरकर यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.गुटखा-तंबाखु व धुम्रपान खाण्यास,थुंकण्यास न्यायालय आवारात बंदी असली तरी अनेक जणांकडुन असे प्रकार घडतातच,मात्र या दोघांना मिळालेल्या जबर शिक्षेमुळे गुटखा-तंबाखु,धुम्रपान करणाऱ्यांमधे चांगलीच खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.