शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची भरपाई मिळावी ; भडगावात शिवसेने युवासेनेचे आंदोलन

0

भडगाव (प्रतिनिधी) : तालूक्यातील अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम पिक बाधीत नुकसान झालेल्या शेतकर्यांना राज्यपालांनी फक्त हेक्टरी ८ हजार रुपये मदत देउ केली आहे. ती मदत तुटपुंजी आहे. ही शेतकर्यांची क्रुर थट्टाच आहे.तरी राज्यपालांनी, शासनाने सरसकट हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत जमा करावी.या मागणीसाठी भडगाव येथे  शिवसेना व युवा सेनेमार्फत दि.२० रोजी रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

शिवसेनेच्या कार्यालयापासुन  सकाळी ११.४५ वाजता पारोळा चौफुली पर्यंत मोर्चा काढण्यात आला. नंतर पारोळा चौफुलीवर जवळपास २० मिनीटे रास्तारोको करण्यात येउन सभेत रुपांतर झाले. यावेळी तहसिलदार माधुरी आंधळे यांना शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मोर्चा व रास्तारोकोवेळी कार्यकर्त्यांनी विविध घोषणा दिल्याने सारा परीसर दणाणला होता. शहरातील शिवसेनेच्या कार्यालयापासुन शिवसेना, युवासेना, कार्यकर्त्यांसह सकाळी ११.४५ वाजता मोर्चा पाचोरा चौफुली, बसस्थानक, पारोळा चौफुलीपर्यंत काढण्यात आला. पारोळा चौफुलीवर जवळपास २० मिनीटे रास्तारोको शिवसेनेमार्फत करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी मनोगतातुन सांगीतले कि, राज्यपालांनी मदत सरसकट हेक्टरी ५० हजार पर्यंत दयावी असे सांगीतले. तर माजी जिल्हा परीषद सदस्य विकास पाटील यांनी मनोगतातुन सांगीतले कि,खरीपाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यपालांनी आता सरसकट हेक्टरी ५० हजारां नंतर शिवसेना शहरप्रमुख मनोहर चौधरी यांनी राज्यपालांना दिलेल्या शेतकर्यांच्या मागण्यांबाबत निवेदन वाचुन दाखविले.

यांची होती उपस्थिती 

यावेळी तहसिलदार माधुरी आंधळे, पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे आदिंना निवेदन देतांना नगराध्यक्ष अतुल पाटील, उपनगराध्यक्ष डॉ.वसीमबेग मिर्झा,माजीनगराध्यक्ष राजेंद्र पाटील, माजी जि. प. सदस्य विकास पाटील, पंचायत समितिचे सभापती रामकृष्ण पाटील, माजी नगराध्यक्ष सुनिल देशमुख, विधानसभा क्षेञ प्रमुख जे. के. पाटील, शिवसेना तालुका प्रमुख डॉ. विलास पाटील, शहर प्रमुख मनोहर चौधरी, नगरसेवक डॉ. प्रमोद पाटील, युवासेना जिल्हा उपप्रमुख विनोद ऊर्फ बबलू पाटील, युवासेना जिल्हा सरचिटणीस लखीचंद पाटील, निलेश पाटील, सुनिल गोकल,माधवराव पाटील निंभोरा,  शेख कदीर, राजु शेख, फिरोजखान, खलील शेख, नासीरखान, मनोहर महाले यांचेसह  शिवसेना, युवासेना व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते  मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.