जामनेरात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

0

जामनेर : – येथील माळी गल्लीतील रहिवाशी प्रमोद  प्रल्हाद महाजन वय ४० यांने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल दि.१८ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.मयताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला.

मयताच्या पश्चात पत्नी,आई,वडील,२ मुल,१ बहिण असावी परिवार आहे.जामनेर रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.जयश्री पाटील यांच्या खबरीवरून जामनेर पोलीस स्टेशनमध्ये सीआरपीसी १७४ प्रमाणे अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर ३२/२०१९ नुसार नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार सुभाष माळी करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.