एस.आर.एम.कार्यप्रणाली बंद करण्याबाबत मुख्यअभियंता यांना निवेदन

0

भुसावळ | प्रतिनिधी 

एस.आर.एम.कार्यप्रणालीमुळे कंत्राटदारांचे  माेठे नुकसान हाेत असून त्यांच्यावर उपासमारीचा प्रसंग आला आहे.पुर्वी प्रमाणे मँन्युअल पध्दत सुरू करावी अशी मागणी वंचित बहूजन कंत्राटदार संघटनेतर्फे करण्यात आली असून या बाबत  मुख्यअभियंता पंकज सपाटे यांना निवेदन देण्यात  आले आहे .

.महाजनकाे मध्ये नव्यानेच एस.आर.एम.(सल्पार्यस रिलेशनशिप मँनेजनेन्ट)ही नविन कार्यप्रणाली आँक्टाेंबर 2019 पासुन अमलात आली आहे.परंतू जेव्हां पासून ही नविन पध्दत सुरू झाली आहे.त्या वेळे पासून कंत्राटदाराना याचा मनस्ताप वाढला आहे. या पासून कंत्राटदारांचे माेठे नुकसान हाेत आहे.सहा सहा महिन्या पासून वेंडरचे तिकिट एस.आर.एम.अपडेट हाेत नाही,चुकीची माहिती अपडेट हाेते,प्राेफाईलची पुर्ण माहिती अपडेट हाेत नाही.यामुळे कंत्राटदारांना निविदा भरता येत नाही ,तसेच निविदा भरल्या नंतर कंत्राटदाराने निविदा साेबत काेणते कागदपत्र जाेडले आहे ते सुध्दा दिसत नाही.आपल्या विभागातील संबंधीत अधिकारी यांना वारंवार विचारले असता ते मुंबई मुख्यालय येथे पाठवले आहे असे सांगतात.मात्र मुख्यालयातून याकडे दुर्लक्ष केले जात आहे.मुंबई येथे ज्यांच्या कडे एस.आर.एमची जबाबदारी  दिली आहे,ते सुध्दा समाधानकारक उत्तर देतात.येथील सर्वच कंत्राटदाराना एस.आर.एम.ची परीपुर्ण माहिती अवगत नाही.त्यामुळे निविदा,काेटेशन,भरता येत नाही आठ महिन्या पासून कंत्राटदारांचे  माेठे नुकसान हाेत असून त्यांच्यावर उपासमारीचा प्रसंग आला आहे.पुर्वी प्रमाणे मँन्युअल पध्दत सुरू करावी अशी मागणी संघटने तर्फ मुख्यअभियंता पंकज सपाटे यांना निवेदना द्वारे करण्यात आली. एस.आर.एम.बंद न केल्यास संघटने तर्फ आपल्या कार्यालय समाेर आंदाेलन करण्यात येईल.  यावेळी वंचित बहूजन कंत्राटदार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मुबारक पठाण,प्रदेश सचिव प्रकाश सरदार,उपाध्यक्ष मन्साराम काेळी,  सहसचिव उस्मान पठाण,काेषाध्यक्ष संताेष तेलंग,शाखाध्यक्ष नारायण काेळी,सचिव दिनकर सुर्यवंशी,उपाध्यक्ष हरपालसिंग संसाेये,संजय रावळकर,के.एस साजी,तसेच स्थानिक कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष फिराेज पठाण,उल्हास बाेराेले,इरफान शेख,मधुकर इंगळे,राजेश पाटील,अरूण पाटील,प्रदिप माळी आदी उपस्थित हाेते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.