रेल्वे उड्डाणपुलांसाठी 70 कोटीचा निधी मंजूर

0

आ. राजुमामा भोळेंच्या प्रयत्नांना यश

जळगाव :- पिंप्राळा रस्त्यावरील रेल्वे फाटकावर उड्डाणपुलासाठी 60 कोटी तर शिवाजी नगर उड्डाणपुलासाठी 10 कोटीची अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला. याबाबत महसूल मंत्री  चंद्रकांत पाटील व जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचे आ. राजुमामा भोळे यांनी आभार मानले आहेत.

महाराष्ट्र राज्याचे पावसाळी अधिवेशन दि. 17 रोजी मुंबई येथे  सुरु झाले. दि. 18 रोजी अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात आ. राजुमामा भोळे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून जळगाव शहरातील पिंप्राळा रस्ता रेल्वे फाटकावरील फाटक क्र. 147 या ठिकाणी  उड्डाणपूल बांधण्यासाठी 60 कोटी व शिवाजीनगर पुलासाठी अतिरिक्त 10 कोटीचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला. यामुळे या कामांना चालना मिळणार आहे. यासाठी राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचे सहकार्य लाभले आहे. याबाबत शहरवासियांच्यावतीने आ. भोळे यांनी मंत्रीद्वयींचे आभार मानले आहेत.

संजय गांधीअंतर्गत मिळणार हजार रुपये

अर्थसंकल्पात सर्वसामान्य घटकांचा विचार करण्यात आला आहे. संजय गांधी निराधार योजनेंतर्गत 600 रुपये देण्यात येत होते. त्यात वाढ करुन 1 हजार रुपये करण्यात आले आहेत. याबाबात शेतकरी व मजूर वर्गाकडून आ. भोळेंचे आभार मानण्यात येत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.