जामठी येथील बौद्ध समाज बांधवांच्या स्मशानभूमीच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यात यावे

0

बोदवड – तालुक्यातील जामठी येथील बौद्ध समाज बांधवांच्या स्मशानभूमीच्या जागेवर करण्यात आलेले अतिक्रमण हटविण्यात यावे,अशी मागणी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.या मागणीचे निवेदन दि.२३ बुधवारी प्रशासनाला देण्यात आले आहे.

जामठी येथे बौद्ध समाज बांधवांच्या स्मशानभूमीच्या जागेवर गेल्या चार दिवसांपूर्वी अंत्यसंस्कार करण्यासाठी समाज बांधव गेले होते.मात्र गट नं.१३/४ च्या जागेवरून शेतकरी व समाज बांधव यांच्यात वाद झाला होता.हा वाद पोलिसांच्या मध्यस्थीने मिटवण्यात आला होता.मात्र आजपोवतो येथील हे अतिक्रमण हलविण्यात आलेले नसून येथील बौद्ध समाज बांधवांचा हा प्रश्न प्रंलबित आहे.त्यामुळे भारतीय बहुजन महासंघातर्फे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे,महासचिव दिनेश इखारे,अ‍ॅड.विनोद इंगळे,तालुकाध्यक्ष सुपडा निकम,महेंद्र सुरळकर,नागसेन सुरळकर,गोपीचंद सुरवाडे यांच्यासह समाजबांधवानी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पोलीस निरीक्षक बळीराम हिरे व तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.

या जागेवर असलेले अतिक्रमण काढावे,अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.गट क्र. १३/४ च्या पोटखराब जागेवर बौध्द समाजाची स्मशानभूमी पूर्वीपासून आहे.या जागेवर समाज बांधव अंत्यसंस्कार करतात.मात्र आता या जागेवर काटेरी कुंपण करण्यात आले असून,ते अतिक्रमण काढण्यात यावे अशी मागणी करीत लवकरात लवकर येथील हे अतिक्रमण हटविण्यात आले नाही तर लोकशाही मार्गाने विविध प्रकारचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.