जादा भावाने किराणा विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाईची मागणी

0

कजगाव,ता.भडगाव (प्रतिनिधी) : तक्रारदार पुढे येईनात आणि प्रशासन कारवाई करेनात यामुळे सामान्य नागरिकांची  लुट सुरूच असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.  त्यामुळे आता प्रशासनानेच एक पाऊल पुढे टाकून जादा भावाने किराणा विक्री करणाऱ्या व्यावसायिकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोरदार होत आहे .

किराणा व्यावसायिकांच्या मनमानी कारभारा विरोधात ”दै.लोकशाही” ने वृत्त प्रकाशीत केल्यानंतर जादाभावाने किराणा विक्री करणाऱ्याचे दाबे चांगलेंच दणाणले होते व आश्चर्य म्हणजे अनेक व्यवसायिकांनी मोठ्या प्रमाणावर भाव कमीही केले आहेत साखर तेल शेंगदाणे त्यांचे भाव प्रत्येकी आठ ते बारा रुपये प्रति किलोने कमी केल्याने ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला होता त्यामुळे संपूर्ण कजगाव व परीसरात दै. लोकशाही च्या वृत्ताचे कौतुक झाले होते. मात्र, तरीही काही निगरगठ्ठ व्यवसायिकांनि आपला मनमानी कारभार चालुच ठेवला असून जादा भावाने किराणा विक्री सुरूच ठेवली आहे त्यामुळे ह्या व्यवसायीकांनी एक प्रकारे प्रशासनातील अधिकाऱ्यांनाच खुले आव्हान दिल्याही चर्चा सध्या परिसरातील नागरिकांमधून चर्चिली जात आहे जादाभावाने किराणा विक्री करणारे व्यवसायिक थेट अधिकाऱ्यांनाच आव्हान देत असल्याने सामान्य नागरिकांनि आशर्य व्यक्त केले आहे.

त्यामुळे जो कोणी व्यवसायिक जादाभावाने किराणा माल विक्री करीत आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोरदार होत आहे. आधीच सामान्य जनतेच्या हाताला कोरोनाच्या पाश्वभूमीवर केंद्र सरकारने लावलेल्या संचारबंदीमुळे कामे नाहीत अनेक छोटे मोठे व्यवसाय बंद पडले आहेत त्यामुळे सामान्यांच्या हातात कुठलीही आर्थिक आवक नसताना किराणा व्यवसायिकांनि सर्रास लूट सुरू ठेवल्याने सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरलेला आहे त्यामुळे आता प्रशासनानेच ठोस भूमिका घेऊन जादाभावाने किराणा माल विक्री करणाऱ्यांर गुन्हे दाखल करावेत असा सूर आता उमटू लागला आहे.

शोषल डिस्टन्सिंग चे किराणा व्यापाऱ्यांकडून उल्लंघन 

कोरोनाच्या पाश्वभूमीवर शासनाने कलम १४४ लागू केली आहे त्यामुळे गर्दी जमवण्यास कायदेशीर गुन्हा दाखल होण्याची कुठलीही भीती व्यापाऱ्यांनामधून दिसत नाही त्यातस कोरोनामुळे सुरक्षेच्या दृष्टीने कोठलीही उपाय योजना दिसून येत नाही अनेक अत्यावश्यक दुकानात ग्राहकांचा घोळका दिसून येत आहे त्यामुळे योग्य त्या उपाय योजना करून शोषल डिस्टन्सिंग चे पालन करण्यात यावे अशी मागणी जोरदार होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.