जागे व्हा ! सरकारच्या निष्काळजीपणामुळे लोकांचे जीव जात आहे – धनंजय मुंडे

0

मुंबई : चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याने हाहाकार माजला. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर अद्याप अनेक जण बेपत्ता आहेत. याच दुर्घटनेवरून धनंजय मुंडे यांनी ट्विटद्वारे सरकारवर निशाणा साधला आहे.

धनंजय मुंडे यांनी ट्विट केले आहे की, ‘रत्नागिरीतील चिपळूणमधील तिवरे धरण फुटून ६ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. भावपूर्ण श्रद्धांजली! अद्याप १६ जण बेपत्ता आहे. सरकारने तातडीने मदत करावी. सरकारच्या निष्काळजीपणामुळे लोकांचे जीव जात आहेत. परत स्ट्रक्चरल ऑडिटचा प्रश्न उपस्थित होतोय. जागे व्हा सत्ताधाऱ्यांनो! असे ट्विट केले आहे.

चिपळूणमध्ये मुसळधार पावसामुळं मंगळवारी रात्री तिवरे धरण भरून वाहू लागलं. काही वेळानं धरणाला भगदाड पडल्याचं लक्षात आल्यानं तलाठ्यांनी धरणाच्या परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा दिला. पण तासाभरातच धरण फुटलं आणि परिसरातील गावांमध्ये पाणी शिरलं. त्यामुळं हाहाकार उडाला. बेंड गावातील घरे पाण्याखाली गेली. वाडीतील ग्रामस्थ वाहून गेले. आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.