जवान मंगलसिंग यास अखेरचा निरोप

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

सावखेडा बु” तालुका पाचोरा येथील दि. १४ रोजी रात्री एक वाजेच्या दरम्यान छातीवर गोळी लागल्याने देशसेवा करीत असतांना धारातीर्थी झालेल्या मंगलसिंग जयशिंग परदेशी (वय  ३५) या जवानावर मंगळवारी दुपारी १२.२० वाजता “मंगलसिंग अमर रहे” च्या जयघोषात सुमारे दहा हजार जनसमुदायाच्या उपस्थित अखेरचा निरोप देण्यात आला.

 

जवान मंगलसिंग परदेशी यांना त्यांचा सहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या १२ वर्षाचा मुलगा चंदन मंगलसिंग परदेशी याने अग्नीदाग दिला. पाचोरा तालुक्यात व परीसरात गेल्या दोन वर्षांतील ही अतीशय दुर्दैवी घटना घडल्याने उपस्थित जनसमुदायास अश्रू अनावर झाले होते. तर त्याचे वृध्द आई, वडील, पत्नी किरण मंगलसिंग परदेशी, मुलगा चंदन मंगलसिंग परदेशी, मुली चंचल मंगलसिंग परदेशी व कांचन मंगलसिंग परदेशी सह नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला होता.

 

सावखेडा बु” येथील जवान मंगलसिंग जयसिंग परदेशी यांनी सुमारे १४ वर्षे सेवा केल्यानंतर नाईक पदावर पदोन्नती झाल्याने तीन वर्षं सेवेचे वाढवून घेतले होते, त्यातही सेवानिवृत्त होण्यासाठी केवळ सहा महिने बाकी असतांना काळाने घाला घातला अन् दि. १४ नोव्हेंबरच्या रात्री एक वाजेच्या पठाणकोट येथील सुजानपूर कॅंन्ट मध्ये सिमेवर असतांना समोरुन अचानकवार होऊन छातील गोळी लागल्याने तो धारातीर्थ झाला.

 

मंगलसिंग परदेशी यांचा मृतदेह दि. १५ रोजी पठाणकोट येथून विमानाने मुंबईला आणल्यानंतर दि. १६ रोजी मंगळवारी पाचोरा येथील शिवसेनेच्या रुग्णवाहिके मधून सावखेडा बु” येथे ९ .३० वाजेच्या दरम्यान आणण्यात आला. त्यांचे पार्थीव देहासोबत पठाणकोट येथून हवालदार अमर माने आले होते. मयतावर पिंपळगाव (हरे.) येथील पोलीसांनी तीन फैऱ्यांच्या सलामी दिल्यानंतर १२.२० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जळगाव, औरंगाबाद, पाचोरा, वरखेडी, पिंपळगाव (हरे), भोकरी, भोजे, डांभुर्णी, आंबेवडगाव, कुऱ्हाड, चिंचपुरा, परिसरातील सुमारे १० हजार महिला, नागरीक, परिसरातील सरपंच, चेअरमन व सेवानिवृत्त सैनिक, विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यांची होती उपस्थिती

जवान मंगलसिंग परदेशी यांचे अंत्यदर्शनासाठी तालुक्याचे आमदार किशोर पाटील, उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रांत बांदल, पोलिस उपअधीक्षक भारत काकडे, गटविकास अधिकारी अतुल पाटील, निवासी नायब तहसीलदार संभाजी पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, डॉ. भुषण मगर, जिल्हा सैनिक कार्यालयाचे अधिकारी ए. बी. काकडे, जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील, दिपकसिंग राजपूत, मधुकर काटे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, परदेशी समाजाचे जिल्हा अध्यक्ष सुरेश परदेशी, सेवानिवृत्त सैनिक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष बाळु पाटील, शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक कृष्णा भोये, राहुल मोरे, भडगावचे माजी नगराध्यक्ष गणेश परदेशी, रमेश बाफना, बाजार समितीचे माजी सभापती अॅड. दिनकर देवरे, डिंगबर पाटील, अॅड. राजेंद्र परदेशी, मंडळ अधिकारी महेंद्र पाटील, तलाठी संदिप चव्हाण, मराठा समाजाचे महंत ह. भ. प. संजयदास महाराज, गोकुळसिंग परदेशी सह परिसरातील महिला व नागरिक, सेवानिवृत्त सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चार कि. मी. अंतरावर रांगोळ्या व तिरंगा ध्वज

पाचोरा तालुका व परिसरात गेल्या दोन वर्षांपासून मंगलसिंग परदेशी यांच्या मृत्य सारखी दुर्दैवी घटना प्रथमच घडल्याने गावातील युवक व महिलांनी वरखेडी पासुन ते सावखेडा बु” पर्यंत चार कि. मी. अंतरा पर्यंत ठिक ठिकाणी तिरंगा ध्वज व २८० मिटरचा तिरंगा ध्वज तयार करून मयत मंगलसिंग परदेशी यांची ट्रकरवर सजावट करुन “भारत माता की जय”, “मंगलसिंग अमर रहे” च्या जयघोषात ५ डी. जे. व बॅण्डच्या गजरात मिरवणूक काढली होती. ही मिरवणूक सुमारे २ तास चालली. सावखेडा व परिसरात मोठी शोककळा पसरली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.