जळगाव बाजार समितीत व्यापारी संकुल होणारच

0

जळगाव :- गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीतल्या व्यापार्‍यांनी बंद पुकारला आहे. मात्र त्यांनी आपला हट्ट सोडून जळगाव बाजार समितीत व्यापारी संकुल हे मनपाच्या परवानगीने आणि कायद्याच्या चौकटीत राहून होणार असल्याचा ठाम निर्धार बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी यांनी बोलताना व्यक्त केला . सर्व्हिस रोड हा होणारच आहे . मात्र व्यापारी संरक्षक भिंत ज्या ठिकाणी होती त्याच ठिकाणी भिंत उभारणीची मागणी करत आहे . परंतु सर्व्हिस रोड हा नियमानुसारच सोडला जाऊन मनपाकडून बांधकाम परवानगी मिळाल्यास 25 फुटांची उंच भिंत बांधण्यात येणार आहे . जुनी भिंत हि 5 फुटांची होती. त्यामुळे माल चोरीस जाण्याच्या घटना घडल्या आहेत . मात्र हि भिंत बांधल्यास माल चोरीस जाणार नाही असेही सभापती कैलास चौधरी यांनी स्पष्ट केले . मनपा आयुक्तांकडे व्यापारी संकुल आणि भिंत बांधण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे . त्याची परवानगी लवकरच होऊन 182 व्यापारी संकुलाचे बांधकामाला टेंडरधारकाडून सुरुवात करण्यात येणार आहे. व्यापाऱयांना 2000 स्क्वेअर फूट जागा भाडेतत्वावर उपल्बध करून दिली असता काही व्यापाऱयांनी जागेच्या पुढे शेड उभारून गोडाऊन भाड्याने दिले आहेत . तसेच सर्व्हिस रोड आणि व्यापारी संकुलाची जागा सोडल्यास व्यापाऱयांना 50 फूट इतकी चार ट्रक एकावेळेस उभे राहू शकतील इतकी जागा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे व्यापार्‍यांची जी मागणी आहे , ती त्यांनी सोडून बाजार समितीला सहकार्य करण्याची भूमिका घ्यावी असे आवाहनही कैलास चौधरी यांनी केले .

मनपाकडून 29 एकर जागेला मंजुरी
नशिराबाद रोडवरील दूरदर्शन टॉवरजवळ 29 एकर जागा खरेदीला मनपाने मंजुरी दिली आहे . येत्या 30 सप्टेंबरपर्यंत 2 कोटी रुपये भूसंपादन विभागाला द्यायचे आहेत . याठिकाणी बाजार समितीचे नवीन व्यापारी संकुल उभारण्यात येणार आहे . या ठिकाणी अद्यावत कोल्ड स्टोरेज , गोडाऊन , दुकानांची निर्मिती केली जाणार आहे. यामुळे बाजार समितीच्या उत्पन्नात भर पडून व्यापारी , शेतकरी बांधवाना याचा फार मोठा उपयोग होणार असल्याचे सभापती कैलास चौधरी यांनी सांगितले.

व्यापार्‍यांच्या बंदमध्ये शासनाने हस्तक्षेप करावा – आ एकनाथ खडसे
जळगाव / मुंबई ;- गेल्या काही दिवसांपासून जळगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापार्‍यांनी नियमबाह्य झालेल्या कामाच्या निषेधार्थ बंद पुकारला असून यामुळे शेतकर्‍यांचा माल बाजार समितीमध्ये येण्याचे बंद झाल्याने शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे . व्यापार्‍यांच्या मागण्या मान्य करून शासनाने यात हस्तक्षेप करून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी माजीमंत्री एकनाथराव खडसे यांनी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडताना केली . यावर मुख्यमंत्र्यानी या बंदबाबत माहिती घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने व्यापार्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या आहे.

बाजार समितीची भिंत विकासकाने पाडलयाच्या निषेधार्थ आडत व्यापार्‍यांनी बंद पुकारला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत बंद कायम ठेवण्याचा निर्धार व्यापार्‍यांनी केला असून व्यापारी संकुल उभारणीला आपला विरोध दर्शविला आहे. तसेच आज जिल्ह्यातील बाजार समितीच्या आडत व्यापार्‍यांनी एकदिवसीय बंद पुकारून जळगाव बाजार समितीच्या व्यापार्‍यांना आपला पाठिंबा दिला आहे. या बंदच्या मुद्द्यावर बोलताना आज विधानसभेत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी प्रश्न उपस्थित करून नियमबाह्य काम झाल्याने शेतकर्‍यांचाही मोठे नुकसान होत असल्याने भाजीपालाही महाग झाला आहे . यासाठी बंद मागेघेऊन सुरळीत व्यवहार होण्यासाठी शासनाने हस्तक्षेप करावा अशी मागणी खडसे यांनी केली. याला उत्तर देताना मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती घेऊन कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाने व्यापार्‍यांना न्याय मिळेल का ? त्याच जागेवर भिंत बांधण्याची मागणी पूर्ण होणार का ?अशी चर्चा जिल्ह्यात दिवसभर सुरु होती.

Leave A Reply

Your email address will not be published.