शेजारच्यांच्या त्रासाला कंटाळून युवकाचाआत्महत्येचा प्रयत्न

0

जळगाव । शेजारी राहणार्‍या महिलेसह तिच्या मुलाच्या त्रासाला कंटाळून ३० वर्षीय युवकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार शहरातील रामेश्वर कॉलनीत एकनाथ नगरमध्ये मंगळवारी सायंकाळी घडला. विषारी द्रव्यप्राशन करून युवक स्वतः एमआयडीसी पोलीस स्टेशनला दाखल झाला. पोलीस स्टेशनच्या आवारात तो कोसळल्याने त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान तरुणाच्या जवळ असलेल्या सुसाईड नोटमध्ये शेजारील महिलेसह तिच्या मुलाच्या नावाचा उल्लेख आहे.

सागर जगन्नाथ इंगळे वय 30 रा. एकनाथ नगर असे तरुणाचे नाव आहे. सागर याचा दुधाचा व्यवसाय असून शेजारील महिला संगीताबाई (पूर्ण नाव माहित नाही) व तिचा मुलगा काहीही कारण नसतांना वारंवार वाद घालून पोलीसात तक्रार दाखल करीत असतात. तक्रारीनंतर पोलीस देखील त्रास देत असल्याने व संगीताबाई (पूर्ण नाव माहित नाही) व तिचा मुलगा यांच्या त्रासाला कंटाळून सागर याने सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास काहीतरी विषारी द्रव्यसेवन केले.

त्यानंतर सागर स्वतः अत्यावस्थ परिस्थितीमध्ये एमआयडीसी पोलीसात दाखल झाला. त्याने पोलीसांना विषारी द्रव्यसेवन केल्याचे सांगितले. याचवेळी पोलीसांनी त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात हलविले. दरम्यान सागर याने लिहीलेल्या सुसाईड नोटमध्ये महिलेसह तिच्या मुलाच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. सागर याच्यावर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.