जळगाव जिल्ह्यात आज ३६ बाधित रुग्ण आढळले

0

जळगाव : जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या घटतीच आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेली घसरण अद्यापही सुरूच आहे. जिल्ह्यात आज ३६ नव्या बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.तर ६२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. दरम्यान आज एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाहीय.

जिल्ह्यात मागील काही दिवसापासून रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणत घटली आहे. आज आढळून आलेल्या रुग्णांनंतर जिल्ह्यातील एकूण बधिताची संख्या १ लाख ४२ हजार २५७ वर गेली आहे. त्यापैकी १लाख ३८ हजार ९४१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. जिल्ह्यात एकूण मृताचा आकडा २५७० वर गेला आहे.

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर ०२, जळगाव ग्रामीण-०१, भुसावळ- ०१, अमळनेर- ०३, चोपडा-०२, पाचोरा-०२, भडगाव-००,धरणगाव-०२, यावल-०२, एरंडोल-०२, जामनेर-०२,रावेर-०१, पारोळा-०३, चाळीसगाव-०६, मुक्ताईनगर-०३, बोदवड-०३, इतर जिल्ह्यातील-०१ असे एकुण ३६ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.