जळगाव जिल्हाधिकारीपदी डी. गंगाधरन

0

जळगांव दि.16 –


जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांची बढतीवर बदली होणार असून त्यांच्या जागी धुळे जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. गंगाथरण यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कर्तव्यदक्ष अशी ख्याती असलेले जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी पदाचा पदभार गेल्या दिड वर्षापूर्वी घेतला. पदाचा पदभार घेतला त्यानंतर महानगरपालिका आयुक्त जिवन सोनवणे यांच्या सेवानिवृत्तीनंतर प्रभारी आयुक्त म्हणून जिल्हाधिकारी निंबाळकर यांचेकडे पदभार सोपविण्यात आला. जिल्हाधिकारी व प्रभारी आयुक्त म्हणून काम करीत असतांना दोन्ही विभागांना अत्यंत कार्यतत्परेतेने न्याय दक्ष राहून कर्तव्य पार पाडले. शहरातील अतिक्रमण असो, वा व.वा.गोलाणी व्यापारी संकुलातील अस्वच्छतेच्या कारणास्तव चार दिवस व्यापारी संकुल बंद ठेवण्याचे आदेश असो अगदी ठामपणे शिस्तप्रिय निर्णय घेतले.
जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर हे मंत्रालयात बढतीवर जात असून त्यांच्या जागी धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. गंगाथरण यांची नियुक्त होणार असल्याची चर्चा जिल्हयात दिवसभर होती  मात्र  याबाबत अधिकृत ऑर्डर अद्याप मिळालेली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.