कुंभमेळ्यासाठी रेल्वे ८०० विशेष ट्रेन चालवणार

0

लखनऊ-

कुंभमेळ्याला येणाऱ्या भाविकांची आणि पर्यटकांची गैरसोय होऊ नये म्हणून देशातील प्रत्येक झोनमधून सहा विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहे. तसेच ५ हजार प्रवासी भारतीयांना प्रयागराजवरून दिल्लीला नेण्यासाठी पाच स्पेशल ट्रेन चालवण्याचा रेल्वेचा विचार आहे. वाराणासीत प्रवासी भारतीय दिनाच्या कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर हे प्रवासी भारतीय कुंभमेळ्याला जाणार आहेत. त्यानंतर नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमातही ते भाग घेतील, असं उत्तर-मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी अमित मालवीय यांनी सांगितलं. या स्पेशल ट्रेनमध्ये १४०० कोच असतील. शिवाय एनसीआर झोनमधून चालवण्यात येणाऱ्या या स्पेशल ट्रेनवर व्हिनाइलचे पोस्टर लावून कुंभमेळ्याची ब्रँडिंग केली जाणार असल्याचंही मालवीय यांनी सांगितलं. या रेल्वेच्या या कोचमध्ये कुंभमेळ्याचे रंगीत आणि आकर्षक फोटो लावण्यात येईल, तसेच प्रयागराजमधील प्रसिद्ध इमारतींचे फोटोही लावण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

या आधीच रेल्वेने ‘पेंट माय सिटी’च्या माध्यमातून कुंभमेळ्याची ब्रँडिंग केली आहे. अलहाबाद रेल्वे स्टेशनवर १० हजार प्रवासी राहतील असे चार मोठे विश्रांतीगृहेही बांधली आहेत. कुंभमेळ्याला येणाऱ्या प्रत्येकावर नजर ठेवण्यासाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आले असल्याचं रेल्वेनं स्पष्ट केलं.

Leave A Reply

Your email address will not be published.